आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इज्तेमाला सुरुवात:मोहाडी उपनगराजवळ इज्तेमाला सुरुवात

धुळे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरापासून जवळ असलेल्या मोहाडी उपनगर जवळ मुस्लिम बांधवांचा इज्तेमाला बुधवारी सुरुवात झाली. त्यासाठी आवश्यक सोयी देखील करण्यात आल्या आहे. खान्देशसोबत इतर जिल्ह्यातूनही अनुयायी या ठिकाणी येत आहे. बुधवार पेक्षा उद्या गुरुवारी अधिक गर्दी होईल, अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.

मोहाडी जवळ तब्लिगी जमातच्या वतीने इज्तेमा होत आहे. बुधवारी त्याची सुरुवात झाली. यातून सकाळी, दुपारी तसेच सायंकाळी प्रवचन घेण्यात आले. दिवस भर भाविकांची गर्दी सुरू होती. इज्तेमाला धुळे, जळगाव, नंदुरबार, अक्कलकुवा, शहादा, मालेगाव येथूनदेखील मोठ्या प्रमाणात नागरिक येऊ शकतील. सुमारे ३० हजारांपर्यंत नागरिक येऊ शकतील असा अंदाज आहे.

त्यासाठी मोठे मंडप, जेवण व पाण्याची सोय करण्यात आली आहे. बुधवारी पहिल्या दिवशी अधिक गर्दी झाली नव्हती. उद्या गुरुवारी ही गर्दी वाढू शकेल, असे आयेाजकांनी सांगितले आहे. तर भविकांची गैरसाेय होऊ नये त्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहे. शिवाय महामार्गावरील वाहतुकीचे देखील नियोजन करत आहे.

याशिवाय इज्तेमाचे आयोजक प्रशासनाला सहकार्य करत आहे. दरम्यान, सुमारे ५ वर्षांनंतर धुळ्यात इज्तेमा होतो आहे. इज्तेमाच्या अनुषंगाने पोलिस प्रशासनाने बंदोबस्तही जाहीर केला आहे. त्यानुसार २० अधिकारी, १३० सहायक उपनिरीक्षक व कर्मचारी, राज्य राखीव पोलिस दलाचे दोन प्लाटून आहेत.

बातम्या आणखी आहेत...