आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन‎:संपूर्ण राज्यभर एक गाव, एक हाेळीसह‎ इक्राे फ्रेंडली हाेळी अभियान राबवावे‎

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एक गाव, एक हाेळी, इकाे फ्रेंडली हाेळी‎ अभियान राबवण्यात यावे, अशी मागणी‎ निसर्ग मित्र समितीने केली अाहे.‎ यासंदर्भात जिल्हाधिकारी जलज शर्मा‎ यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे‎ यांना निवेदन पाठवण्यात अाले अाहे.‎ पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड‎ करून वृक्षसंवर्धन करणे काळाची गरज‎ असून, होळी निमित्ताने होणारी वृक्षतोड‎ व पाण्याची नासाडी थांबवण्यासाठी एक‎ गाव-एक होळी, इको फ्रेंडली होळी‎ अभियान राबवून पर्यावरणाच्या राष्ट्रीय‎ उपक्रमाला प्रोत्साहन द्यावे. तसेच हे‎ अभियान शासनातर्फे संपूर्ण‎ महाराष्ट्रभर एक गाव-एक होळी हा‎ कार्यक्रम राबवण्यात यावा.

हे अभियान‎ राबवण्यासाठी जिल्हास्तरीय संबंधित‎ अधिकारी तसेच गावातील‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सरपंच,ग्रामसेवक यांना सूचना देऊन‎ सर्व ग्रामस्थांना गाव पातळीवर अवगत‎ करावे, आपल्या परिसरातील वृक्षांचा‎ सांभाळ करून एक गाव-एक होळी या‎ अभियानाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद‎ द्यावा, अशा आशयाचे निवेदन‎ जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री‎ एकनाथ शिंदे यांना देण्यात आले.‎ जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन‎ देताना निसर्ग मित्र समितीचे समितीचे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ संस्थापक अध्यक्ष प्रेमकुमार अहिरे,‎ राज्य महा सचिव संतोष पाटील,‎ जिल्हाध्यक्ष डी. बी. पाटील, राज्य‎ संघटक किशोर डियालाणी, राज्य‎ संघटक प्रभाकर सूर्यवंशी, जिल्हा‎ सचिव विश्वासराव पगार, धुळे शहर‎ संघटक प्रा. चंद्रशेखर विसपुते, धुळे‎ शहर संघटक भूषण चौधरी, प्रसिद्धी‎ प्रमुख हर्षल महाजन आदी पदाधिकारी‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...