आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील रामसिंग नगरकडे जाणाऱ्या रस्त्याजवळील हॉटेल समोरील परिसरात खासगी वाहनांमध्ये गॅस सिलिंडर मधून अवैधरीत्या गॅस भरताना दोन जणांविरुद्ध शिरपूर पोलिसांनी कारवाई केली आहे. शिरपूर पोलिस निरीक्षक ए. एस. आगरकर यांना गुप्त माहिती मिळाल्यावर तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षण अधिकारी प्राजक्ता सोमलकर, पोउनि संदीप मुरकुटे व शोध पथकाचे अंमलदारांनी खात्री केली.
की दि. ३ रोजी शहरातील रामसिंग नगरकडे जाणाऱ्या रस्त्यालगत हॉटेल समोरील रस्त्याच्या पलीकडे पूर्वेस श्रीकृष्ण सर्व्हिस सेंटर नावाने गाळा असलेल्या खोलीमागील जागेत व साई डिजिटल समर्थ ऑइल नावाचे पत्री दुकान येथे गणेश मोहन माळी (वय २४) व दिनेश राजेंद्र माळी (वय ३१ दोन्ही रा. वरवाडे शिरपूर) असे गैरकायदेशीर रीत्या घरगुती वापराचे गॅस सिलिंडर मधील गॅस इलेक्ट्रिक मोटारीचे सहाय्याने वाहनांमध्ये भरण्यासाठी वापर करीत असताना मिळून आलेल्या संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध पोकों गोविंद सुरेश कोळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.