आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअवैध सावकारी करणारे राजेंद्र जीवनलाल बंब याची पोलिस कोठडीत रवानगी झाली आहे. या गुन्ह्यात प्रथमच अनियमित ठेव योजना बंदी अधिनियमानुसार कलम लावण्यात आले आहे. अवैध सावकारी विरोधात ठोस भूमिका घेणाऱ्या धुळे पोलिसांचे कौतुक होत आहे.
जुने धुळे परिसरातील रहिवाशी तथा समाजात विमा प्रतिनिधी म्हणून काम करणारे राजेंद्र बंब यांच्याकडे मंगळवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांच्या पाच पथकांककडून तपासणी सुरू होती. त्यानंतर त्यांच्या अटकेची प्रक्रिया पार पाडण्यात आली. या गुन्ह्यात राजेंद्र बंब यांना अनियंत्रित ठेव योजना बंदी अधिनियमातील कलम २१, २२, २३, २५ नुसार प्रथमच कलम लावण्यात आले आहे.
अशी आहे शिक्षेची तरतूद
अनियंत्रित ठेव योजना बंदी अधिनियमानुसार दाखल गुन्हा सिद्ध झाला तर संशयित आरोपीला शिक्षेचीही तरतूद आहे. यामध्ये २ ते १० लाखांपर्यत दंड तसेच सुमारे ७ वर्षांपर्यंत शिक्षा देखील होऊ शकते.
आझादनगर पोलिस स्टेशनमध्ये मुक्काम
बंब यांना रात्री सुमारे ११ वाजता आझाद नगरच्या लॉकअपमध्ये ठेवले. त्यानंतर सकाळी आर्थिक गुन्हे शाखेत आणले. न्यायालयातून ४ वाजून ३५ मिनिटांनी धुळे शहर पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये, यानंतर सायंकाळी पुन्हा आझादनगर लॉकअपमध्ये नेले.
६ जूनपर्यंत सुनावली पोलिस कोठडी
बुधवारी दुपारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने राजेंद्र बंब यांना धुळे न्यायालयात उभे करण्यात आले. न्या. बेग एम.जे.जे. यांच्या समक्ष कामकाज झाले. अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील पराग मधुकर पाटील यांनी बाजू मांडली. शिवाय या गुन्ह्यातील इतर बारकावे व सखोल तपासासाठी संशयित बंब यांच्या पोलिस कोठडीची मागणी झाली. त्यानुसार न्या. बेग यांनी बंब यांना ६ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
आता पुढे काय? : राजेंद्र बंब यांच्या नावे बँक-पतसंस्थेतही खाते व लॉकर असू शकते. त्याठिकाणी ही तपासणी करायची आहे. शिवाय जप्त कागदपत्रे, कोरे धनादेश कोणाचे याबाबत चौकशी होणार आहे. त्यासाठी बंबं यांच्याकडे विचारणा होऊ शकते.
व्याप्तीनुसार दंड, संशयित वाढू शकतात
या गुन्ह्यात अनियंत्रित ठेव योजना बंदी अधिनियमानुसार प्रथमच कलम लावले आहे. गुन्ह्यातील आर्थिक व्याप्तीनुसार दंडाची रक्कम आकारली जाते. या गुन्हयात संशयितांची संख्या देखील वाढू शकते.
अॅड. पराग पाटील, सरकारी वकील
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.