आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Dhule
  • Illegal Moneylender Rajendra Bamban Insures Insurance Company; The Police Sought Information From The Insurance Company About The Number Of Policies Surrendered In 10 Years |marathi News

अवैध सावकार:अवैध सावकार राजेंद्र बंबने विमा कंपनीला अंधारात; 10 वर्षांत किती पॉलिसी सरेंडर केल्या याची पोलिसांनी मागवली विमा कंपनीतर्फे माहिती

धुळे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवैध सावकार राजेंद्र बंबने विमा कंपनीला अंधारात ठेवत सरेंडर पॉलिसींची रक्कम गडप केल्याचे समोर येते आहे. त्यामुळे सरेंडर पॉलिसींची चौकशी सुरू झाली आहे. त्यासाठी गेल्या १० वर्षांत किती नागरिकांनी पॉलिसी सरेंडर केली यासह इतर प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलिस यंत्रणा विमा कंपनीकडून माहिती मागवणार आहे. समाजात विमा प्रतिनिधी म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या राजेंद्र बंबचा अवैध सावकारीचा चेहरा कारवाईमुळे समोर आला आहे.

कर्ज देतानाही प्रत्येकाला विमा काढणे बंधनकारक होते. त्यासाठी कर्जानुसार विम्याचे स्वरूप अवलंबून होते. त्यातून कर्जदाराला दरमहा व्याजाप्रमाणे निर्धारित वेळेत विमा कंपनीचा हप्ताही भरावा लागत होता. पण कालांतराने अनेक कर्जदार विमा हप्ता भरण्यास असमर्थ ठरत होते. शिवाय यापूर्वी भरलेल्या रकमेबद्दलही पाठपुरावाही केला जात नव्हता. ही बाब पोलिसांच्या तपासात समोर आली. त्यानंतर सखोल चौकशीतून सरेंडर पॉलिसी आणि त्याच्या रकमेतील गैरप्रकाराचा पोलिसांना संशय आला.

त्यामुळे काही कागदपत्रे तपासली. कर्जदार नागरिक व विमा कंपनीला चकमा देत राजेंद्र बंब मिळणारा पैसा स्वत: घेत होता. असे काही चौकशीतून पुढे आले आहे. त्यामुळे या गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची दाट शक्यता आहे. पोलिसांनी आता थेट विमा कपंनीशी पत्रव्यवहार करायचे ठरवले आहे. त्यासाठी राजेंद्र बंबने गेल्या दहा वर्षांत काढलेल्या विमा पॉलिसी व धारकांची माहिती मागवली जाते आहे. सरडेंर पॉलिसी म्हणजे काय विम्यानुसार हप्ता भरला जातो. विमा धारकाने मुदतीपूर्वीच पॉलिसी बंद केली. तर त्याला सरेंडर पॉलिसी म्हटले जाते. त्यानंतर विमा कंपनीच्या नियम व भरलेल्या हप्त्यानुसार विमाधारकाला रक्कम परत केली जाते. त्यासाठी पॉलिसी सुरू करताना भरलेला अर्जाचा संदर्भ घेतला जातो.

या प्रश्नांची मागवली माहिती
राजेंद्र बंबने १० वर्षांत किती पॉलिसी काढल्या, किती जणांनी पॉलिसी सरेंडर केल्या, पॉलिसी धारकाचे नाव व नंबर, पॉलिसीचा हप्ता, एकूण रक्कम किती, पॉलिसी कधी सरेंडर झाली, कोणत्या बॉंक, पतसंस्थेत पाॅलिसी सरेंडर झाली, पॉलिसी सरेंडर नंतर रक्कम कोणी काढली, कोणच्या चेकवर रक्कम निघाली याची माहिती पोलिसांनी मागवली आहे.

हातचलाखीने केली सही
राजेंद्र बंबने कर्ज देताना विमा काढणे बंधनकारक केले होते. कर्जाच्या रकमेतून विम्याचा पहिला हप्ता काढून घेतला जात होता. अर्ज भरताना चलाखीने अर्जावर सरेंडर पॉलिसीच्या पर्यायावर बंब त्याचे नाव लिहीत होता. त्यामुळे हप्ता फेडू न शकणाऱ्या नागरिकांच्या बंद पॉलिसीतील रक्कम राजेंद्र बंब त्याच्या खात्यात जमा करत होता, असा पोलिसांचा संशय आहे.

पथकाला सूचना
खासगी सावकारी प्रमाणे विम्याच्या माध्यमातून कर्जदाराला गंडवले जात होते. त्यामुळे विमा कंपनीशी पत्रव्यवहार करून माहिती मागवणार आहे. त्यासाठी आवश्यक सूचना केल्या आहे.
-प्रवीणकुमार पाटील, पोलिस अधीक्षक, धुळे

बातम्या आणखी आहेत...