आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठ्या उत्साहात व शांततेत विसर्जन:बोरद येथे शांततेत विसर्जन

बोरद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोरद येथे कानुबाई मातेचे मोठ्या उत्साहात व शांततेत विसर्जन करण्यात आले.साधारणपणे २५ ते ३० कानुबाई मातेच्या स्थापना करण्यात आल्या होत्या. ३१ जुलै रोजी दुपारी ४ वाजता बोरद येथे कानुबाई मातेची स्थापना करण्यात आली होती. सकाळी ठीक ८ वाजता पुण्यपावन मंदिरापासून योगेश पाटील व नितीन पाटील यांच्या डोक्यावर कानूबाई माता विराजमान झाली. तिथून बँडच्या तालावर वाजत गाजत विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. या भव्य मिरवणुकीत एका मागोमाग एक अशा सर्व कानुमातांचा मिरवणुकीत सहभाग होत्या.

कानूबाई माता बाजारपेठेत भेट होत असते. सर्व कानुबाई माता बाजार पेठेत आल्यानंतर बाजारपेठेतील गाव विहिरीवर एकत्र आले. तेथे मोठ्या प्रमाणावर तरुण मंडळी पाण्याची उधळण करत तेथे बँडच्या तालावर नाचत होते. कानबाई मातेच्या गाण्यावर सर्व गावातील महिला एकत्र गरबा खेळत होत्या.

बातम्या आणखी आहेत...