आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकृषी क्षेत्राकडे सगळ्यांचे दुर्लक्ष होत असताना उच्चशिक्षित युवक मात्र शेतीत वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहेत. असाच प्रयोग शिरपूर तालुक्यातील अर्थे खुर्द येथील युवा शेतकरी सत्यपाल गुजर यांनी केला आहे. त्यानी केळी पिकवून ती इराणच्या बाजारात पोहाेचवली आहे. सत्यपाल गुजर हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात नोकरीला आहे. ते नोकरी सांभाळून गावी वडिलोपार्जित शेतीत आधुनिक पद्धतीने प्रयोग करून युवकांपुढे आदर्श निर्माण केला आहे.
त्यांनी एप्रिल महिन्यात केळी लागवड केल्यापासून केळी व्यवस्थापन करून अवघ्या नवव्या महिन्यांत आपल्या शेतातील केळी परिपक्व करून केळीला आखाती देशांमध्ये म्हणजे इराण मध्ये निर्यात करून एक प्रकारे देशाला परकीय चलन प्राप्त करून दिले आहे. एप्रिल २०२२ मध्ये अजित सीडचे केळीचे रोपे लागवड केली. याकामी वितरण व्यवस्थापक गुणवंत मोरे आणिसंचालक बलराम राजपूत व्यवस्थापकीय संचालक नीलेश राजपूत यांच्यावतीने सदर केळी पीक इराण येथे निर्यात केली आहे. त्यांना हेमंत चौधरी यांचे कृषी व्यवस्थापन संदर्भात विशेष मार्गदर्शन लाभले.
सेंद्रिय खतावरती प्राधान्य
केळी उती संवर्धित रोप लागवड केल्यापासून व्यवस्थापन केल्यास व वातावरणांनुसार रासायनिक वेगवेगळ्या कीटकनाशकांचा वापर करण्यापेक्षा सेंद्रिय खतावरती प्राधान्य दिले व जैविक फवारणी करून केळी पिकाची काळजी घेतल्यास, घडाला व्यवस्थित झाकून दिल्यास निर्यातक्षम केळी उत्पादन करता येते असा विश्वास मला निर्माण झाला. आधुनिक पद्धतीने शेती करावी याच्या आदर्श आजोबा कै. फकिरा गुजर यांच्या पासून मिळाला.ते गावात केळी उत्पादनात तालुक्यात अग्रेसर होते. कृषीदृष्टी डोळ्यासमोर ठेवून केळी विदेशात जावी यासाठी नियोजन केले. युवकांनी शिक्षण घेऊन आपले ज्ञान कृषी क्षेत्रात वापरावे व कृषी व्यवस्थेला ऊर्जितावस्था प्राप्त करून द्यावी. - सत्यपाल गुजर, युवा शेतकरी अर्थे खुर्द
३०३१ रुपये क्विंटल दराने निर्यात
सध्या दोन एकर केळी लागवड करून पहिल्याच खेपेत १२ टन केळी इराण येथे निर्यात केली आहे. या वेळी आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट भाव केळी पिकाला मिळाला असून ३०३१ रुपये क्विंटल दराने केळी निर्यात केलेली आहे. निर्यात क्षम केळी आपल्या गावातून निर्यात होऊ शकते हे युवा शेतकऱ्यांनी सिद्ध केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.