आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:बारावीच्या परीक्षेत, शिरपूर तालुक्यात 20 शाळांचा निकाल 100 टक्के

शिरपूर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे, शिरपूर बारावीच्या परीक्षेत शिरपूर येथील आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलातील २० शाळांचा निकाल १०० टक्के लागला. आर. सी. पटेल संस्थेतील सर्व १ हजार ६०७ विद्यार्थी पास झाले. १८९ विद्यार्थ्यांना ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळाले. तसेच १ हजार ५५५ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह तर ५२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. शिरपूर शहरातील एच. आर. पटेल कन्या विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील अनम रफिक शेखने ९५.१७ टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला. गुणवंत विद्यार्थ्यांना आमदार अमरीश पटेल, कार्याध्यक्ष भूपेश पटेल, चिंतन पटेल आदींचे मार्गदर्शन लाभले.

विज्ञान शाखेतील गुणवंतांची नावे अशी : आर. सी. पटेल विज्ञान महाविद्यालय- प्रथमेश नेरकर ९३.८३ टक्के, गांगेश धनगर ९३ टक्के, यशकुमार पाटील ९१.६७ टक्के, मानव बिरारे ९१.३३ टक्के, जयेश करनकाळ ९१.१७ टक्के, हर्षल पाटील ९१.१७ टक्के, दर्शन पाटील ९१.१७ टक्के. विद्यार्थ्यांना प्राचार्य पी. व्ही. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. एच. आर. पटेल कन्या कनिष्ठ महाविद्यालय- अनम रफिक शेख ९५.१७ टक्के, अमिश्री तुरखिया ९४.५० टक्के, प्राजक्ता पाटील ९४.५० टक्के, मुस्कान गुप्ता ९४.३३ टक्के, दीक्षिता पाटील ९४.३३ टक्के, डिंपल वारुडे ९४.१७ टक्के. सर्वांना प्राचार्य आर.बी.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. आर. सी. पटेल इंग्लिश मीडियम विज्ञान महाविद्यालय- लोकेश पाटील ९४.१७ टक्के, कशिश जैन ९४ टक्के, विशाखा पटेल ९३ टक्के, समीक्षा सूर्यवंशी ९२.८३ टक्के, आदित्य जांगिड ९२.५० टक्के, सृष्टी मराठे ९२.५० टक्के. सर्वांना प्राचार्य सचिन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

आर. सी. पटेल विज्ञान कनिष्ठ आश्रमशाळा होळनांथे- दिव्या भटू माळी ९२.१७ टक्के, प्रियंका पवार ९२ टक्के, जयश्री चव्हाण ९१.८३ टक्के, रोहिणी राठोड ९१ टक्के, रोहिणी पाटील ९०.६७ टक्के. विद्यार्थ्यांना प्राचार्य व्ही. आर. सुतार यांचे मार्गदर्शन लाभले. मुकेशभाई पटेल मिलिटरी स्कूल- केयूर संजय ठाकरे ९१ टक्के, वैष्णवी तुकाराम दोरिक ९०.८३ टक्के, नंदिनी सुरेशसिंग राजपुरोहित ९०.६७ टक्के, सानिका राजेश तळेले ९०.५० टक्के, ईश्वर बापू मराठे ९०.५० टक्के. विद्यार्थ्यांना प्राचार्य दिनेशकुमार राणा यांचे मार्गदर्शन लाभले.

आर. सी. पटेल विज्ञान कनिष्ठ आश्रमशाळा- लक्ष्मी सायसिंग पावरा ९२.६७ टक्के, रोहित पावरा ९२.५० टक्के, विनोद पावरा ९१.६७ टक्के, मनोज पावरा ९१ टक्के, कपिल पावरा ९१ टक्के, शर्मिला पावरा ९०.६७ टक्के. विद्यार्थ्यांना प्राचार्य एच. के. कोळी यांचे मार्गदर्शन लाभले. आर. सी. पटेल विज्ञान कनिष्ठ आश्रमशाळा निमझरी- ऋषभ पावरा ९३.६७ टक्के, रितेश पावरा ९२ टक्के, अक्षय पावरा ९१.५० टक्के, संजना पावरा ९१.१७ टक्के, रितेश पावरा ९०.६७ टक्के. सर्वांना प्राचार्य पी.डी.पावरायांचे मार्गदर्शन लाभले.

आर. सी. पटेल विज्ञान कनिष्ठ आश्रमशाळा वाघाडी- साजन पावरा ८९ टक्के, सुप्रिया पावरा ८९ टक्के, जुदा वळवी ८८.३३ टक्के, रोशनी पावरा ८७.३३ टक्के, अरविंद पावरा ८७.८३ टक्के, सागर पावरा ८७.५० टक्के, पंकज पावरा ८७.५० टक्के, दाज्या पावरा ८७ टक्के, वर्षा पावरा ८७ टक्के. सर्वांना प्राचार्य के. जे. राजपूत यांचे मार्गदर्शन लाभले. आर. सी. पटेल उर्दू विज्ञान महाविद्यालय- राहील खान पठाण ८९.८३ टक्के, सबा शेख तेहेरीन ८९.५० टक्के, निदा पठाण ८८.३३ टक्के, नईम अहमद इफा ८८ टक्के, फराजोद्दीन रईसोद्दीन शेख ८७ टक्के.

बातम्या आणखी आहेत...