आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंद पथदिव्यांचे लोकार्पण:कामाचे श्रेय घेण्याच्या घाईतच  बंद पथदिव्यांचे आमदारांकडून लोकार्पण

धुळे4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साक्रीरोडवर दोन दिवसांपूर्वी शहराचे आमदार फारुख शाह यांनी पथदिव्यांच्या कामाचे लोकार्पण केले. तसेच या कामासाठी निधीदेखील आणल्याची खोटी माहिती आमदार शाह यांनी दिली आहे. मात्र त्यांचा या कामाशी काेणताही संबंध नसताना ते श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहे. या कामासाठी निधी भाजपच्या माध्यमातून अगोदरच मंजूर झाला आहे. त्यातूनच पथदिव्यांचे काम मार्गी लागले आहे. मात्र श्रेय घेण्याच्या घाईत बंद पथदिव्यांचे लोकार्पण आमदार शाह यांनी केल्याची माहिती पत्रकार परिषदेत भाजपचे नगरसेवक हर्षकुमार रेलन यांनी दिली.

साक्रीरोडवरील पथदिव्यांचे कामाचे श्रेय घेण्याच्या मुद्द्यावरून प्रभाग क्रमांक ७ चे नगरसेवक हर्षकुमार रेलन यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी माहिती देताना सांगितले की, शहराचे आमदार फारुख शाह पथदिव्यांच्या निधीबाबत खोटे बोलत आहे. ३७ लाखांच्या निधीशी त्यांचा काय संबंध, भाजपचे तत्कालीन आमदार अनिल गोटे यांनी तो निधी आणला होता. त्याचा पाठपुरावा करून पथदिवे लावले. श्रेयासाठी आमदारांनी धडपड का केली, हे समजायला मार्ग नाही. श्रेय हवे होते तर त्यांच्याच हस्ते लोकार्पण केले असते. बंद पथदिव्यांचे लोकार्पण करून त्यांनी काय मिळवले असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. प्रभागात जवळपास २० कोटींची विकास कामे केली. त्यामुळे प्रभागात या विकास पहा, अशी टोलेबाजीही भाजपचे प्रभाग ७चे नगरसेवक रेलन यांनी केली. नगरसेविका किरण कुलेवार, कशिश उदासी उपस्थित होत्या.

बातम्या आणखी आहेत...