आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:‘अनुबंध’ साहित्य अभिवाचनात कथा, कवितांच्या‎ सादरीकरणातून मराठी राजभाषेचा केला जागर‎

धुळे‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी राजभाषा दिनानिमित्त‎ विचारपुष्प वाचक मंच धुळे‎ यांच्यातर्फे "अनुबंध’ हा साहित्य‎ अभिवाचनाचा कार्यक्रम व्यंकटेश‎ लॉन्स येथे घेण्यात आला.‎ अनुबंध या कार्यक्रमानिमित्त‎ सहायक जिल्हाधिकारी तृप्ती‎ धोडमिसे या प्रमुख पाहुणे म्हणून‎ उपस्थित होत्या. तृप्ती धोडमिसे‎ यांनी असे वाचक मंच शहरा‎ शहरात उपलब्ध व्हावे आणि वाचन‎ संस्कृती नित्य वाढत राहावी,‎ याबद्दल मार्गदर्शन केले.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎

कार्यक्रमानिमित्त सेवानिवृत्त प्रा.‎ रंजना खैरनार यांनी पुस्तक भिशी,‎ तसेच वाचक मंचचा साहित्य वारसा‎ याबद्दल माहिती दिली. पुस्तक भिशी‎ अध्यक्ष अॅड. अंजली महाजनी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ यांनी सर्व कार्यकारी मंडळ व‎ वाचक मंचचे महत्त्व सांगितले.‎ कार्यक्रमात डॉ. रूपाली चित्ते, डॉ.‎ मनीषा भावसार, कल्पना‎ चांदसरकर व सुनंदा खैरनार यांनी‎ "फ्लेमिंगो’ या कथेचे सादरीकरण‎ केले. डॉ. सीमंतिनी पाटील आणि‎ कथाकथनकार रेखा मुंदडा यांनी‎ "आणि तसे झाले तर?’ या कथेचे‎ अभिवाचन केले. डॉ. सुप्रिया‎ पाटील, डॉ. कीर्ती पाटील यांनी स्त्री‎ विषयक कवितांचे सादरीकरण‎ केले. कीर्ती नांदोडे यांनी उंच माझा‎ झोका या गाण्याचे सादरीकरण केले.‎ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ज्योती‎ बोरकर आणि पुष्पा कानडे यांनी‎ केले. या वेळी धुळेकर रसिकांनी‎ विशेष उपस्थिती देऊन कार्यक्रमाची‎ रंगत वाढवली. या वेळी महिला‎ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.‎

बातम्या आणखी आहेत...