आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन वर्षांपासून स्थिती:पाणीपुरवठा विभागाचा पदभार प्रभारी अधिकाऱ्याकडे, कामकाज थंडावले

धुळे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पद तीन वर्षांपासून रिक्त आहे. आतापर्यंत उपअभियंत्याकडे प्रभारी पदभार होता. आता बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे पाणीपुरवठा विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बांधकाम विभागाचा अावाका अफाट असताना पाणीपुरवठ्याची जबाबदारी या विभागाकडे सोपवण्यात आल्याने कामाचा खोळंबा होतो आहे.

केंद्र शासनाने सन २०२४ पर्यंत हर घर जल से नल हे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या मोहिमेची जबाबदारी ग्रामीण पाणीपुरवठा विभागावर आहे. पण तीन वर्षांपासून या विभागाला पूर्णवेळ कार्यकारी अभियंता नाही. काही वर्षांपूर्वी निवृत्तीसाठी काही महिने शिल्लक असलेले ब्रजेश सेंगर, सी. पी. वाघ यांच्यावर या विभागाची जबाबदारी होती. ते निवृत्त झाल्यानंतर तीन वर्षांपासून विभागाची जबाबदारी उपअभियंत्यावर होती. या विभागाला राज्य शासनाकडून पूर्णवेळ अधिकारी देण्यात येत नाही.दिला तर निवृत्तीच्या तोंडावर असलेल्या अधिकाऱ्याला पाठवण्यात येते. त्यामुळे कामाची घडी बसत नाही. आता या विभागाची जबाबदारी थेट बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे देण्यात आली आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि बांधकाम विभाग अशा दोन महत्त्वाच्या विभागाचा भार एकाच अधिकाऱ्यांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे कामांना न्याय देताना संबंधित अधिकाऱ्याची तारांबळ उडते आहे. शिवाय तक्रारी घेऊन येणाऱ्या अभ्यागतांना पुरेसा वेळ देता येत नाही. त्यामुळे दोन्ही विभागाच्या कामांचा खोळंबा होतो आहे. त्यामुळे याविषयाकडे लक्ष देण्याची गरज आहे. पाणीपुरवठा विभागाला पूर्णवेळ अधिकारी मिळावा यासाठी लोकप्रतिनिधींनीही पाठपुरावा करण्याची गरज आहे.

बातम्या आणखी आहेत...