आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा महोत्सव:जयहिंदच्या क्रीडा महोत्सवात‎ जिंकण्यासाठी वाढली चुरस‎

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील जयहिंद शैक्षणिक ट्रस्टच्या‎ जयहिंद इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक‎ क्रीडा महोत्सव झाला. महोत्सवात‎ जिंकण्यासाठी चुरस दिसून आली.महोत्सवाचे उद्घाटन जयहिंद‎ शैक्षणिक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. अरुण‎ साळुंखे यांच्या हस्ते झाले. या वेळी‎ संस्थेचे उपाध्यक्ष प्रमोद पाटील,सचिव प्रदीप भदाणे, जयहिंदइंग्लिश स्कूलचे चेअरमन नानाभाऊकौर, वसंतराव ईशी, शेखरसूर्यवंशी आदी उपस्थित होते. डॉ.अरुण साळुंखे यांच्या हस्तेध्वजारोहण झाले. शालेय क्रीडास्पर्धेतील विजयी खेळाडूंनी क्रीडाज्योत शाळेच्या प्रांगणात आणली.प्रमोद पाटील यांच्या हस्ते क्रीडा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ज्योत स्थापन करण्यात आली.‎

क्रीडा ध्वजाचे नेतृत्व भाविका‎ पाटील व अनस खान यांनी केले.‎ दोन दिवसीय क्रीडा महोत्सवात‎ नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी‎ सहभाग नोंदवला. क्रीडा‎ महोत्सवाचा समारोपाचा एरोबिकने‎ झाला. शाळेचा फुटबॉल खेळाडू‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ यशकुमारने क्रीडा ध्वज‎ सन्मानपूर्वक शाळेचे मुख्याध्यापक‎ चैतन्य भंडारी यांच्याकडे सोपवला.‎ मुख्याध्यापक चैतन्य भंडारी यांनी‎ प्रास्ताविक केले. वैशाली जोशी,‎ स्वाती देवरे, निलोफर यांनी‎ सूत्रसंचालन केले. स्वाती देवरे यांनी‎ आभार मानले.‎

बातम्या आणखी आहेत...