आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादावर सामोपचाराने तोडगा:मेहेरगावात वादाला मूठमाती देत भरवले पेढे

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे तालुक्यातील मेहेरगाव येथे पोळ्याच्या दिवशी वाद झाला. त्यातून गुन्हे दाखल झाले. त्यानंतर एका समाजावर बहिष्कार टाकण्यात आला. त्यामुळे तणाव वाढला होता. या पार्श्वभूमीवर गावात गुरुवारी सर्वसमावेशक बैठक झाली. बैठकीत परस्परांवर दाखल गुन्हे मागे घेण्याचे ठरले. तसेच गावात पुन्हा अशा घटना घडणार नाहीत, यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासह जाती-भेदाला थारा न देण्याचा ठराव झाला. बैठकीत एकमेकांना पेढे भरवत वादावर सामोपचाराने तोडगा काढण्यात आला.

आमदार कुणाल पाटील अध्यक्षस्थानी होते. पाेळ्याच्या दिवशी घडलेल्या घटनेनंतर एका समाजातील नागरिकांना दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा आरोप झाला. यावरच आमदारांनी ही बैठक बोलावत ग्रामस्थांत एकोपा घडवला.

बातम्या आणखी आहेत...