आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील वसंतराव नाईक वरीष्ठ महाविद्यालयातील पदार्थविज्ञान विभागातर्फे //"राष्ट्रीय विज्ञान दिवस’ साजरा करण्यात आला. या वेळी प्राणिशास्त्र विभाग प्रमुख व बोर्ड ऑफ स्टडीजचे सदस्य प्रा. डॉ. आर. डी. पाटील उपस्थित होते. प्रथम भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते भारतीय शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी पदार्थविज्ञान विभागप्रमुख प्रा. डॉ. बी. वाय. बागुल यांनी बोलताना डॉ. सी. व्ही. रमण यांच्या रमण इफेक्ट्सचे महत्व तसेच मानवतेला भेडसावणाऱ्या जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी वैज्ञानिक सहकार्य आणि संशोधनाचे महत्व म्हणून विज्ञान दिन का साजरा केला जातो.
विज्ञानाचे आजच्या जीवनात किती महत्व आहे, हे स्पष्ट केले. जगात चमत्कार होत नसतात. ज्या काही घटना घडतात त्यामागे केवळ हात चलाखी किंवा विज्ञान असते, असे सांगून डोळे उघडून बघा गड्यांनो हे विज्ञान गीत प्रा. बागुल यांनी सादर केले. प्रा.डॉ. आर. डी. पाटील यांनी मार्गदर्शन करताना ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि अनुसंधान यांची सांगड घालून विद्यार्थांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवला पाहिजे, असे सांगितले. या प्रसंगी मनीषा मराठे, नुर फातिमा तेली, अफिया पिंजारी, फिरदोस शब्बीर पिंजारी, भूमिका पाटील, श्रुती सोनवणे, माधुरी पाटील, अर्सिन काद्री या विद्यार्थीनींनी विज्ञान गीते सादर केली. कार्यक्रमाला प्रथम व द्वितीय वर्ष भौतिकशास्त्रातील विद्यार्थी उपस्थित होते. सातपुडा शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. संजय जाधव, वर्षा जाधव, प्राचार्य डॉ. अशोक पाटील, समन्वयक संजय राजपूत यांनी उपक्रमाचे कौतुक केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.