आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:शहादा येथे कापसाला मिळाला 12 हजार 551 ​​​​​​​ रुपयांचा भाव;नांदरखेडा येथे वनश्री फार्मरतर्फे कापूस खरेदीचा केला शुभारंभ

शहादाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील वनश्री फार्मर प्रोड्युसर कंपनीचा सन २०२२-२३ या नवीन हंगामाच्या कापूस खरेदीला विधीवत पूजा करुन शहाद्याचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांचा हस्ते १२ हजार ५५१ रुपये प्रति क्विंटल दर देऊन सुरुवात करण्यात आली.

वनश्री जिनिंग, प्रेसिंग व ऑइल मिलचा प्रांगणात मोहिदा येथील परमानंद पाटील यांनी सपत्नीक पूजा करुन सुरुवात केली. या वेळी वनश्रीचे मार्गदर्शक मोतीलाल पाटील यांच्या हस्ते शरद शंकर पाटील (मोहिदे) यांच्या कापसाला मुहूर्त भाव १२ हजार ५५१ रुपये प्रती क्विंटल एवढा देण्यात आला. कार्यक्रमास कंपनीचे अध्यक्ष अभिजित पाटील, संचालक दगडू पाटील, हिरालाल पाटील,नरसई पटेल, अनिल पाटील, संगीता पाटील, प्रिती पाटील,दिनेश पाटील तसेच परिसरातील कापूस उत्पादक शेतकरी, सभासद व सर्व कर्मचारी उपस्थित होते. शेतकऱ्यांनीही उत्तम प्रतीचा माल वनश्री फार्मर कंपनीला देऊन सभासद हित साधावे, असे आवाहन अभिजित पाटील यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...