आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Dhule
  • In Shahada Taluka Only 2 Thousand Laborers On 6 Thousand Jobs Of 'Employment Guarantee'; Lessons From Laborers As They Get More Employment In Private Work |marathi News

तुटपुंजी मजुरी:शहादा तालुक्यात ‘रोजगार हमी’च्या 6 हजार कामांवर केवळ 2 हजार मजूर; खासगी कामात अधिक रोजगार मिळत असल्याने मजुरांकडून पाठ

शहादा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आता नावालाच उरली असून, ग्रामीण भागात कामांना मजूर मिळत नसल्याने ही योजना बंद करण्याची वेळ शासनावर येऊ शकते. मजूर न मिळण्याचे प्रमुख कारण म्हणजे मजुरांना प्रतिदिन फक्त २४८ रुपयांची मजुरी दिली जाते. ही मजुरी तुटपुंजी असून प्रतिवर्षी पाच ते सहा रुपयांची वाढ होत राहते. तालुक्यात सध्या ७३ गावांत कामे सुरू असून, ६ हजार २०० कामांवर फक्त २ हजार ३१ मजूर काम करतात. केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून रोजगार हमी योजनेकडे पाहिले जायचे. आता या योजनेकडे दुर्लक्ष होत आहे. पूर्वी योजनेंतर्गत लाखो मजूर कामे झाली असून, १ एप्रिल २०२१ पासून मजुरांना २४८ रुपयांची मजुरी मिळत आहे. ही मजुरीदेखील तुटपुंजी असल्याने शासनाच्या धोरणाविरोधात मजुरांमध्ये नाराजी आहे. मजुरांची संख्या २०३१ झाली आहे. आता ही संख्या बोटावर मोजण्याएवढी झाली आहे. सामाजिक वनीकरण, वन विभाग तसेच खासगी बांधकामांवर कमीत कमी पाचशे ते आठशे रुपयांची प्रतिदिन मजुरी मिळत आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेकडे जायचे कसे असा सवाल मजूर करीत आहेत.

वेळेवर मिळत नाही मजुरी : बहुतांश ठिकाणी वेळेवर मजुरी मिळत नाही. अशा तक्रारी येतात. त्यामुळे कामे सोडून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. रोजगार हमी योजनेपेक्षा बांधकामांवर जास्त मजुरी मिळते. तिही वेळेवर मिळते. म्हणून खासगी बांधकामांवर मजूर जास्त जाताना दिसतात.

२४८ रुपयांत घर चालणे कठीण
खासगी बांधकामांवर कमीत कमी पाचशे तर आठशे रुपये रोज मिळताे. त्यामुळे महागाईमुळे रोजगार हमीकडे जायचे कसे. कारण २४८ रुपयांच्या मजुरीत घर चालणे मुश्कील आहे. त्यामुळे किमान पाचशे रुपयांची मजुरी मिळावी. जेनेकरून उदरनिर्वाह चालेल. जामसिंग ठाकरे, मजूर

बातम्या आणखी आहेत...