आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तृतीयपंथींचे नाव मतदार यादीत:शिरपूरमध्ये नऊ तृतीयपंथींचे नाव मतदार यादीत;रेशनचे धान्य मिळणार

शिरपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील तहसील कार्यालयात आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी ओळख दिनानिमित्त कार्यक्रम झाला. या वेळी शिरपूर तालुक्यातील ९ तृतीयपंथी नागरिकांची नावे मतदार यादीत नोंदवण्यात आली. तृतीयपंथींना लवकरच रेशनमधून धान्य देण्यात येईल, अशी माहिती या वेळी तहसीलदार आबा महाजन यांनी दिली.

तृतीयपंथींची संख्या अधिक असणाऱ्या ठिकाणी मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी शिबिर घेण्यात येणार आहे. तहसीलदार आबा महाजन यांनी सांगितले की, लोकशाही मजबूत करण्यासाठी समाजातील सर्व घटकांची भागीदारी आवश्यक आहे.

त्यासाठी समाजातील वंचित घटक मुख्य प्रवाहात आले पाहिजे, त्यांनाही लोकशाही प्रणालीत सहभाग नोंदवला पाहिजे यासाठी त्यांचे नाव मतदार यादीत असणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. तृतीयपंथींनी भावना व्यक्त केल्या.

बातम्या आणखी आहेत...