आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वातावरणात गारवा:शहरात पारा 8 अंशांवर‎ स्थिरमुळे वाढला गारवा‎

धुळे‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात किमान तापमानाचा पारा ८‎ अंशांवर स्थिरावला आहे. काही‎ दिवसांपासून किमान तापमानात घट‎ झाल्याने वातावरणात गारवा निर्माण‎ झाला आहे. कमाल तापमान मात्र‎ ३० अंशाची नोंद केली आहे.‎ शहरात पुन्हा किमान तापमानात‎ घट झाली आहे. तीन दिवसांपासून‎ किमान तापमानाचा पारा १०‎ अंशांखाली घसरून ८ अंशांवर‎ तापमान स्थिर झाले आहे.‎

तापमानात दिनांक २ फेब्रुवारीपासून‎ बदल झाला आहे. यादिवशी किमान‎ तापमान १० अंशाची नोंद करण्यात‎ आली होती. त्यानंतर तापमानात घट‎ होऊन ८ अंशाची नोंद कृषी‎ महाविद्यालयात झाली हाेती.‎ जानेवारीच्या शेवटी तापमानात वाढ‎ झाली होती. किमान व कमाल‎ तापमानात वाढ झाली होती. मात्र‎ फेब्रुवारी महिन्यात उत्तरेकडे‎ होणाऱ्या बर्फ वृष्टीमुळे थंड वारे‎ वाहू लागल्याने रात्रीच्या तापमानात‎ घट झाली आहे. सायंकाळनंतर‎ गारवा जाणवत आहे. तर दिवसा‎ मात्र उन्हाची तीव्रता जाणवत आहे.‎ कमाल तापमान रविवारी ३०‎ अंशाची नाेंद केली आहे. हे तापमान‎ काही दिवसांसाठी राहणार असून‎ यानंतर तापमानात वाढ होणार‎ असल्याचा अंदाज हवामान‎ तज्ज्ञांनी व्यक्त केला.‎

बातम्या आणखी आहेत...