आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:शहरात राष्ट्रीय छात्रसेनेतर्फे शहिदांच्या कुटुंबाचा गौरव करून कृतज्ञता व्यक्त

धुळे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रक्षा मंत्रालय, ४८ महाराष्ट्र बटालियन एनसीसीतर्फे एसएसव्हीपीएस महाविद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहिदो को शत् शत् नमन हा कार्यक्रम झाला. शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सत्कार झाला.एनसीसीचे समादेशक अधिकारी कर्नल पराग कुलकर्णी अध्यक्षस्थानी होते. यावेळी एसएसव्हीपीएस कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर पाटील, डॉ. पां.रा. घोगरे विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्ही. पाटील आदी उपस्थित हाेते. शहीद जवान जयवंत सूर्यवंशी कर्ले, तुकाराम गोखले मालपूर-कासारे, मुंग्या राऊत वलवाडी, पोपट पाटील धुळे, ज्ञानेश्वर पाटील अर्थे, योगेश भदाणे खलाणे, दीपक चौधरी वलवाडी, केशव माळी धुळे, ज्ञानदेव जाधव मोघण, माणिक दिगंबर पाटील मोहाडी यांच्या कुटुंबांचा सत्कार झाला.

मनिषा शेवाळे, अरुणा राऊत, सुरेखा पाटील, पूनम भदाणे, भारती चौधरी यांनी सन्मान स्वीकारला. कार्यक्रमाला २०४ छात्रसैनिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कॅप्टन के. जी. बोरसे, कॅप्टन के. एम. बोरसे, कॅप्टन महेंद्रकुमार वाढे, लेफ्टनंट सुनील पाटील, लेफ्टनंट शशिकांत खलाणे, क्रांती पाटील, चीफ ऑफिसर एन. व्ही. नागरे, फर्स्ट ऑफिसर पी. यू. पवार, फर्स्ट ऑफिसर ए. टी. गोरे, सेकंड ऑफिसर प्रतिज्ञा बोरसे, सेकंड ऑफिसर अल्तमश खान, थर्ड ऑफिसर एस. टी. पाटील, सुभेदार मेजर सुभाष सिंग, जेसीओ इंदर कुमार, जेसीओ राजवीर सिंग, संदीप आहेर, लखविंदर सिंग, पवन कुमार, नवीन कुमार, रोशनलाल, राजेंद्र पवार, हवालदार सोहम सिंग यांनी प्रयत्न केले.

बातम्या आणखी आहेत...