आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Dhule
  • In The First Rains, Gullies And Gutters Overflowed, Causing Water To Seep Directly Into The Houses; Power Supply Was Cut Off Everywhere, Today's Water Supply In The City Was Cut Off |marathi News

पाणीपुरवठा ठप्प:गटारी तुंबल्यामुळे थेट घरांमध्ये शिरले पाणी; सर्वत्र वीजपुर‌वठा खंडित, शहरातील आजचा पाणीपुरवठा झाला ठप्प

धुळे17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वातावरणातील उकाडा असह्य असताना शनिवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास जोरदार वारे, विजांचा कडकडाटासह मान्सूनच्या पहिल्या मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शहरातील सर्वच भागात मुसळधार पाऊस झाल्याने काही वेळातच सर्वत्र पाणी होऊन रस्त्यावरून पाणी वाहून निघाले आहे. त्यात काही ठिकाणी झाडे पडली तर बहुतांश फांद्या तुटून पडल्या होत्या. तसेच वडजाई रस्त्यावर गटारी तुंबून घरात पाणी शिरले. तर नालाही तुंबला होता. शहरातील राणाप्रताप चौकातील विद्यानिकेतन हायस्कूलच्या आवारातील वृक्षाची फांदी, पारोळा रोड चौफुली येथे हॉटेललगत असलेले निंबाचे वृक्ष उन्मळून रस्त्यावर पडले होते. त्याच रस्त्याने पुढे ऐंशी फुटी रस्त्यावर जांभळाच्या झाडाची मोठी फांदी पडली होती. सुभाष चौकात पाणी भरले होते. वडजाई रोडवर सुरुवातीलाच असलेल्या चौकात खोलगट ठिकाणी पूर्णपणे रस्त्यावर पाणी साचले होतो.

येथील गटारी तुंबल्याने पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरले होते. पाणी काढण्यासाठी नागरिकांची कसरत सुरू होती. त्याच रस्त्यावर पुढे नाला तुंबला होता. महापालिकेतर्फे तेथे तातडीने जेसीबीच्या साह्याने सगळा कचरा काढून नाला वाहता करण्याचे काम सुरू होते. नटराज टॉकीज मागील भागातील नाला ही असाच तुंबला होता. तर शहरात जुनी महापालिका चौकात, अंडाकृती उद्यान, खोलगल्ली, बारापत्थर रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले होते. यात देवपूर भागातील रस्त्याची स्थिती काही ठिकाणी खराब होती. तर पावसामुळे त्यात भर पडली आहे. यात जयहिंद वरिष्ठ महाविद्यालय ते कनिष्ठ महाविद्यालयापर्यंतचा रस्ता व दत्त मंदिर ते आयटीआय पर्यंतच्या रस्त्यावर खड्ड्यामध्ये पाणी भरले आहे.

घरात पाणी शिरल्याने हाल
शहरात पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले. नाल्याचीही सफाई नुकतीच करण्यात आली असली तरी काही ठिकाणी नाले तुंबले हो ते. गटारीची नियमित सफाई गरजेची असतानाही ती होत नाही, हे पावसाने दाखवून दिले आहे. आता पावसाला सुरुवात झाल्याने किमान ज्या भागात नेहमी त्रास होतो. तेथील काम प्राधान्याने घेणे आवश्यक आहे.

एक दिवस उशिराने पाणीपुरवठा
पावसामुळे हनुमान टेकडी जलशुद्धीकरण केंद्र येथील वीजपुरवठा शनिवारी दुपारी ३ वाजेपासून बंद असल्याने शहरात एक दिवस उशिराने पाणीपुरवठा होणार आहे. कुमारनगर, अशोकनगर, सिमेंट जलकुंभावरून पाणीपुरवठा एक दिवस उशिरानेच होईल, असे मनपाने कळवले आहे.

रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित
शहरात शनिवारी दुपारी पावसाला सुरुवात झाल्यावर वारेही वाहत असल्याने वीजपुरवठा खंडित झालेला होता. याप्रमाणे शहरातील सर्वच भागात हा वीजपुरवठा जवळपास खंडित होता. सायंकाळी ६.३० वाजेपर्यंतही वीजपुरवठा सुरळीत झालेला नव्हता.

वातावरणात गारवा, शहरवासीयांना दिलासा
शहरात शनिवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली आहे. वारा, विजेच्या कडकडाटासह सुरुवातीचे अर्धातासापेक्षा अधिक वेळ मुसळधार पाऊस सुरू होता. त्यानंतरही मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी शहरात कोसळत होत्या. एक तासांपेक्षा अधिक वेळ पाऊस शहरात कोसळला आहे. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. उकाडयानंतर नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...