आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेनेतर्फे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ बुधवारी शिवसैनिकांकडून पदयात्रा काढीत घोषणाबाजी केली गेली. मात्र या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित आणि दोन्ही महानगरप्रमुख मनोज मोरे, सतीश महाले हे अनुपस्थित होते. शिवसेनेच्या महानगरप्रमुखपदावर निवड झाल्यापासून शिवसेनेकडून होणाऱ्या प्रत्येक आंदाेलनाचे नेतृत्व हे मनोज मोरे यांच्याकडून करण्यात येत आहे. मात्र बुधवारी पक्षप्रमुखांच्या समर्थनप्रसंगीच जिल्हाप्रमुखांसह दोन्ही महानगरप्रमुख अनुपस्थित होते. त्यातही मनोज मोरे व त्यांच्याबरोबर असणारे याप्रसंगी गैरहजर राहिल्याने शिवसैनिकांमधून खदखद व्यक्त केली जात आहे. याप्रसंगी काही शिवसैनिकांकडून उघडपणे नाराजीही व्यक्त केली.
राज्यभरात सत्तांतराचे नाट्य घडत असताना राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख उध्दव ठाकरे आणि स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या समर्थनार्थ शहरात शिवसेनेच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी एकत्र येत घोषणाबाजी करीत आम्ही सर्व तुमच्या बरोबर असल्याचे सांगितले. मात्र याप्रसंगी काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची गैरहजेरी खटकली. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे हे काही आमदारांना घेवून गुजरातमध्ये गेल्याने राज्यातील आघाडी सरकार अडचणीत आले आहे. यासंदर्भात गेल्या दोन दिवसापासून अनेक राजकीय घडामोडी घडत आहे. त्याचे पडसाद बुधवारी शहरातही उमटले. काल अनेक आमदार नॉटरिचेबल होते. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्तेही संभ्रमात होते. नेमके काय घडामोडी घडतात. याकडे त्यांचे लक्ष होते. त्यामुळे शहरातील प्रबोधनकार ठाकरे संकुलातील शिवसेनेच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात मंगळवारी दिवसभर शुकशुकाट होती.
यांची होती उपस्थिती : बुधवारी सकाळीच शिवसेनेचे सहसंपर्क नेते अतुल सोनवणे, शिंदखेडा-शिरपूर विधानसभा संघटक माजी जिल्हाप्रमुख हिलाल माळी, संघटक धीरज पाटील,डॉ.सुशिल महाजन, विनोद जगताप, कैलास मराठे, पंकज भारस्कर, नाना वाघ, बाबू पटेल, संदीप सूर्यवंशी, संदीप चव्हाण, कपिल लिंगायत, कैलास पाटील, सचिन बडगुजर, संजय जवराज, ललीत माळी, महादू गवळी, चंदू गुरव, सागर निकम, जवाहर पाटील, बाबा पाटील, भटू गवळी,हेमा हेमाडे किरण जोंधळे, महेश मिस्तरी यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र आले.
बंडखोर आमदारांचा निषेध
शिवसेनेचे संस्थापक स्व.बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा हातात घेवून मध्यवर्ती कार्यालयापासून घोषणाबाजी करीत जुन्या महापालिकेपर्यंत पायी चालत आले. त्याठिकाणी घोषणाबाजी करून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना समर्थन करीत बंडखोरी करणाऱ्या आमदारांचा निषेध नोंदविला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.