आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाेकार्पण:अडीच वर्षांत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी पळवला निधी : भुसे

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत साक्री तालुक्यातील कासारे येथे शनिवारी विकासकामांचे लाेकार्पण झाले. या वेळी कांद्याला हमी भाव मिळावा, ओला दुष्काळ जाहीर करून भरपाई द्यावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मंत्री दादा भुसे यांना काळे झेंडे दाखवले. या वेळी शेतकऱ्यांचे म्हणणे मंत्री भुसे यांनी ऐकून घेतले. महाविकास आघाडीच्या काळात अडीच वर्षे सर्व निधी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी पळवला. आता शेतकऱ्यांचे हित पाहणारे सरकार सत्तेत आले आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्राेत्साहन रक्कम दिली जाईल, असे मंत्री भुसे यांनी या वेळी स्पष्ट केले.

कासारे येथे गाव दरवाजाजवळ नामफलकाचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमात गावातील तीन ते चार शेतकऱ्यांनी हातात काळे फडके घेवून निषेध केला. तसेच ५० खाेके एकदम ओके अशा घाेषणा दिल्या. त्यामुळे गाेंधळ उडाला. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार शेतकऱ्यासह सर्व घटकांच्या विकासासाठी कटीबद्ध आहे. सरकारने इंधनाचे दर कमी केले. सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून अहवाल देण्याचे आदेश दिले आहे. नुकसान भरपाईची मर्यादा दाेन हेक्टरवरून तीन हेक्करपर्यंत वाढवली आहे. साक्रीसह कासारे परिसराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही भुसे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...