आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाच्या डी.एन. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत ‘प्रकल्प- प्रदर्शन २०२२’चे आयोजन करण्यात आले. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे अधिष्ठाता व पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे आर्ट, सायन्स व कॉमर्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एस. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.जे. पाटील यांच्यासह संस्थेच्या विविध विद्या शाखांचे प्राचार्य उपस्थित होते. या प्रकल्प- प्रदर्शनाअंतर्गत विविध शाखांच्या ३९ प्रकल्प गटांनी सहभाग नोंदवला. त्यात विद्यार्थी व विद्यार्थिनींनी ई-लर्निंग ऑनलाइन एज्युकेशन अॅप, ईझी फार्मिंग, अॅग्रीकल्चर रोबोट, बॅटरी लेस ई-बाइक, आर्टीफिशिअल ट्रान्सपोर्ट सिस्टीम, इंटेलिजंट रोबोट, अर्लीप्रिडीक्शन ऑफ लाईफ स्टाईल डिसीजेस, पीएलसी बेस्ड अॅटोमॅटीक कटींग मशीन, आय ओटी बेस्ड होम ऑटोमेशन सिस्टिम व डिझुमीडिफायर ड्रायर फॉर फूड अॅन्ड अॅग्री प्रॉडक्ट असे विविध प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. सर्व प्रकल्पांचे तज्ज्ञांकडून परीक्षण करण्यात आले. त्यानंतर प्रथम व द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे अध्यक्ष प्रा.एस.आर. पाटील व सदस्य प्रा.हिमांशू पटेल, प्रा.पंकज पाटील, प्रा.सी.सी. पाटील व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंदाने परिश्रम घेतले. तसेच तज्ञ म्हणून डॉ.डी.एम. पटेल, प्रा.व्ही.एस. महाजन व प्रा.प्रशांत पाटील यांनी काम पाहिले. या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचे मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव कमल पाटील, समन्वयक प्राचार्य मकरंद पाटील, प्राचार्य डॉ.एन.जे. पाटील, अकॅडमिक डीन डॉ.डी.एम. पटेल, कुलसचिव डी.एन. पाटील, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.