आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधुळे रेल्वे स्टेशनचा अमृत भारत स्टेशन याेजनेत समावेश झाला आहे. या याेजनेतून देशातील तीनशे रेल्वे स्टेशनचे आधुनिकीकरण होईल अशी माहिती खासदार डाॅ. सुभाष भामरे दिली. खासदार डाॅ. सुभाष भामरे यांनी सांगितले की, केंद्रीय अर्थसंकल्प नुकताच सादर झाला. त्यात रेल्वे मंत्रालयासाठी २ लाख ४० हजार काेटींची तरतूद आहे. महाराष्ट्रासाठी १ हजार ३०० काेटीचे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहे.
त्याबचरोबर मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्यात बाेरविहीर ते नरडाणा मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. भूसंपादनासह रेल्वे मार्ग टाकण्यासाठी निधीची अावश्यकता आहे. निधी केंद्राकडून मिळवण्याचा प्रयत्न आहे.रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत नरडाणा रेल्वे मार्गासाठी भरीव तरतूद करावी, अशी मागणी केली होती.
रेल्वे मार्गासाठी जमिन संपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर रेल्वे रूळ टाकण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. तसेच केंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन योजनेत धुळे रेल्वे स्टेशनचा समावेश झाला आहे. देशाच्या अमृत महाेत्सवानिमित्त ही याेजना राबवण्यात येते आहे. योजनेत देशातील ३०० रेल्वे स्टेशनचा समावेश आहे. त्यामुळे आगामी काळात धुळे रेल्वे स्टेशनचे अत्याधुनिक होईल. स्टेशनमध्ये प्रवाशांसाठी विविध सोयी सुविधा केल्या जातील, असेही खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी स्पष्ट केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.