आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरसोय:नंदुरबार-पंढरपूर मार्गावर जुन्या बसमुळे गैरसोय

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार ते पंढरपूर मार्गावर नेहमी जुनी बस सोडली जाते. काही वेेळा बस रस्त्यात नादुरुस्त हाेते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याने याविषयाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. नंदुरबार ते पंढरपूर बस धुळे मार्गे जाते. ही बस धुळ्याहून जाते. नंदुरबारहून पंढरपूर ५५० तर धुळ्याहून ४५० किमी आहे. नंदुरबार-पंढरपूर बसमध्ये धुळ्यातून अनेक प्रवासी बसतात.

शहरातील पांडुरंग जगन्नाथ घाटुळे हे दरमहा पंढरपूरला कामानिमित्त जातात. पण बहुतांश वेेळा ही बस रस्त्यात नादुरुस्त होते. त्यामुळे प्रवाशांना ताटकळावे लागते. याविषयी वारंवार तक्रार होते. याविषयी पांडुरंग घाटुळे यांनी एसटी महामंडळाच्या धुळे कार्यालयात काही दिवसांपूर्वीच निवेदन दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...