आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरसोय‎:नवरंग जलकुंभातून पाण्याचा‎ पाणीपुरवठा बंदमुळे गैरसोय‎

धुळे‎15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराच्या देवपूर भागात पाणीपुरवठा सुरळीत‎ व्हावा, यासाठी नवरंग जलकुंभाच्या बाजूला‎ नवीन जलकुंभ बांधण्यात आला. या‎ जलकुंभाची चाचणी झाली. त्यातून‎ पाणीपुरवठाही सुरू झाला. पण आता पुन्हा‎ तांत्रिक अडचणीमुळे पाणीपुरवठा बंद झाला‎ आहे. आता अक्कलपाडा पाणीपुरवठा‎ योजनेचे काम झाल्यावर या जलकुंभातून‎ पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.‎ देवपुरात नवरंग जलकुंभावरून‎ पाणीपुरवठा होतो. हा जलकुंभ जीर्ण व जुना‎ झाल्याने ताे पूर्ण क्षमतेने भरता येत नाही.‎ त्यामुळे या जलकुंभाच्या शेजारी नवीन‎ जलकुंभ बांधण्यात आला.

किरकोळ‎ कामांमुळे जलकुंभातून पाणीपुरवठा सुरू‎ झाला नव्हता. त्यानंतर महाराष्ट्र जीवन‎ प्राधिकरणाने काम पूर्ण करून जलकुंभ‎ महापालिकेकडे सोपवला. त्यानंतर मनपा‎ प्रशासनाने जलकुंभाची चाचणी घेतली. तसेच‎ पाणीपुरवठा सुरू केला. पण जलकुंभाचा‎ व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्याने पुन्हा पाणीपुरवठा‎ बंद झाला. तो अद्याप सुरू झालेला नाही. हा‎ जलकुंभ तापी योजनेवरून भरला जातो.‎ जलकुंभ भरण्यास सुरुवात केल्यावर बडगुजर‎ प्लॉट, मालेगाव रोड व मायक्रो जलकुंभ भरणे‎ त्रासदायक होते. त्यामुळे सद्य:स्थितीत नवरंग‎ जलकुंभातून पाणीपुरवठा करणे बंद असून या‎ जलकुंभाचा व्हॉल्व्हही खराब झाला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...