आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरसोय‎:चिमठाणे स्थानकात बस येत नसल्याने गैरसोय‎

धुळे‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचाहून‎ रात्री सुटणाऱ्या बस चिमठाणे‎ बसस्थानकात येत नाही. त्यामुळे‎ प्रवाशांची गैरसोय होत असल्याने ‎दोंडाईचाहून सुटणाऱ्या बस चिमठाणे ‎बसस्थानकात नेण्याची सूचना‎ चालकांना करावी, अशी मागणी युवा‎ मंचचे दुर्गेश पाटील यांनी केली आहे.‎ याविषयी त्यांनी एसटी महामंडळाच्या ‎दोंडाईचा आगारप्रमुखांना निवेदन दिले.‎ निवेदनात म्हटले आहे की,‎ दोंडाईचाहून धुळ्याकडे जाणाऱ्या किंवा‎ धुळ्याहून दोंडाईचा जाणाऱ्या बस रात्री‎ चिमठाणे बसस्थानकात येत नाही.‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ त्यामुळे रात्री-अपरात्री येणाऱ्या-‎ जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होते.‎ याविषयाकडे लक्ष द्यावे, चालकांना सर्व‎ बस चिमठाणे बसस्थानकात नेण्याची‎ सूचना करावी, अशी मागणी झाली. या‎ वेळी पंढरीनाथ पाटील, बाळा राजपूत,‎ सागर राजपूत, संदीप पाटील, नंदकिशोर‎ पाटील, गोलू राजपूत, मुकेश राजपूत,‎ जयसिंग राजपूत, राहुल गिरासे, विशाल‎ राजपूत आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...