आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:शास्त्रोक्त पद्धतीने शेतीचे उत्पादन वाढवा : रावल

शिंदखेडा4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने शेती करून उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन आमदार जयकुमार रावल यांनी केले. येथील काकाजी मंगल कार्यालयात तालुक्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पूर्व मेळावा व शेतकरी शास्त्रज्ञ परिसंवाद कार्यक्रम झाला. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य कामराज निकम, पंचायत समिती सभापती अनिता राकेश पाटील, उपसभापती राजेश पाटील, गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे, उपनगराध्यक्ष प्रकाश देसले, जिल्हा परिषद सदस्य धनंजय मंगळे, डी. आर. पाटील, वीरेंद्रसिंग गिरासे, पंकज कदम, उप विभागीय कृषी अधिकारी एस. डी. मालपुरे, तालुका कृषी अधिकारी विनय बोरसे, पंचायत समिती सदस्य रणजितसिंह गिरासे, नारायणसिंग गिरासे, डॉ.दीपक बोरसे, छाया रणजित गिरासे, दीपक मोरे, अरुण सोनवणे, जिजाबराव सोनवणे, साहेबराव पेंढारकर, सुभाष माळी, प्रकाश चौधरी, सूरज देसले, डी. एस. गिरासे आदी उपस्थित हाेते. आमदार जयकुमार रावल म्हणाले की, शिंदखेडा पूर्वी कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात होता. मात्र, मागील काळात तापी नदीवरील बॅरेज, सिंचन विहिरी, जलयुक्त शिवार योजना, बुराई नदी पात्रात बांधलेले बंधारे यामुळे सिंचन क्षेत्र वाढले आहे. आता साठ टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे.

भविष्यात तालुक्यात पाऊस झाला नाही तरी सुलवाडे जामफळ प्रकल्प, प्रकाशा प्रकल्पाच्या माध्यमातून अमरावती धरण व वाडी शेवाडे धरणात पाणीसाठा करता येईल, असेही ते म्हणाले. या वेळी कृषी सहायक उमाकांत सावंत, बी. डी. जळे, एस.डी. मालपुरे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. कृषी अधिकारी विनय बोरसे यांनी आढावा सादर केला. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेंतर्गत भास्कर आत्माराम पाटील यांना २ लाखांचा, पूनम समाधान गिरासे यांना २ लाखांचा, महेंद्र शांतिलाल गिरासे यांना ३ लाखांचा धनादेश देण्यात आला. तसेच अन्य योजनेतील लाभार्थ्यांना आर्थिक मदत करण्यात आली. सूत्रसंचालन मुकेश सोनवणे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...