आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडीचा प्रभाव कमी:धुळे शहरात किमान तापमानात वाढ कायम

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात किमान तापमानात वाढ होऊन ढगाळ वातावरणही कायम आहे. त्यामुळे थंडी सध्या गायब झालेली आहे. तर दुपारच्या वेळी फिरताना शहरात उन्हाचे चटके बसत आहे. शहरात बुधवारी सकाळी काही प्रमाणात धुके दिसून आले. शहरातील वातावरण अजूनही कायम ढगाळ आहे. या ढगाळ वातावरणामुळे थंडीचा प्रभाव कमी झालेला आहे. बुधवारी किमान तापमान १४ अंश तर कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली आहे. किमान तापमानात वाढ झाल्याने रात्रीच्या वेळी जाणवणारा गारवा देखील कमी झाला आहे.

याप्रकारे थंडी कमी झाल्याने गरम कपड्यांचा वापरही कमी झालेला आहे. मात्र बुधवारी सकाळी शहरात काही प्रमाणात धुके वातावरणात निर्माण झाले होते. सध्या नागरिक या विचत्र वातावरणाचा काहीसा अनुभव घेत आहेत. यामुळे काहींना या वातावरणाचा त्रासही जाणवत आहे.

बातम्या आणखी आहेत...