आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णांचे प्रमाण दुप्पट:सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांत वाढ; फ्लूसाठी लस घेतल्यास धोका कमी

धुळे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात गेल्या काही दिवसांपासून उकाडा आणि पाऊस होत आहे. त्यातच ढगाळ वातावरण असल्याने अनेकांना या बदलत्या वातावरणाचा त्रास होऊन सर्दी, खोकला ताप अशी लक्षणे दिसत आहे. सर्दी, खोकला अधिक वाढल्यास अनेकांना न्यूमोनियाचा त्रास होत आहे. या सर्वात फ्लूचे रुग्ण वाढतात, रुग्णालयात काही दिवसांपासून सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्णांचे प्रमाण दुप्पट झाल्याचे दिसत आहे.

शहरात गेल्या काही दिवासांपासून बदलत्या वातावरणामुळे अनेकांना आरोग्याच्या तक्रारी जाणवत आहे. शहरात खासगी रुग्णांलयात सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी आदी लक्षणे असलेल्य रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. इतर वेळी नियमीत येणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत आठ ते दहा दिवसात सर्दी, ताप, खोकला, न्यूमोनियाचा लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. खासगी रुग्णालयाप्रमाणे महापालिकेच्या दवाखान्यातही रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. त्यात शहरात मागील आठवडयात स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले होते. सर्दी, खोकला, ताप रुग्णामध्ये ज्यांची प्रतिकार क्षमता कमी आहे. असे रुग्णांमध्ये पुढे न्यूमोनिया बळावतो. बदलत्या वातावरणाचा त्रास अनेकांना होत असून त्यातही ज्येष्ठ नागरीक, मधुमेह, हृदविकार, रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांना अधिक जाणवत आहे. कफ प्रवृत्तीचा त्रास अधिक बळावल्याचे दिसून येत आहे.

अशी घ्या काळजी
सध्या ढगाळ वातावरण व हवेतील थंड, दमटपणा यामुळे अनेकांना सर्दी, घशाला त्रास, खोकला, ताप असे आजाराचे लक्षण दिसत आहे. सर्दी, खोकला दोन ते तीन दिवस असल्यास डॉक्टरांकडून योग्य ते निदान व तपासणी करुन घ्यावी. त्याचप्रमाणे बाहेर गर्दीच्या ठिकाणी जातांना मास्कचा वापर करावा. बाहेरुन आल्यावर हात धुवावे. अन्न गरम व ताजेच खावे. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत.

फ्लूसाठी लस लाभदायी
शहरातील वातावरणात काही दिवसापासून बदल झालेला दिसत आहे. या बदलांचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून सर्दी, कफ, ताप, खोकला आजाराचे लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. प्रतिकार क्षमता कमी असणाऱ्यांना न्यूमोनियाचा धोका आहे. तर मुधमेह, हृदयविकार आदि आजाराचा त्रास असणाऱ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी करुन दरवर्षी फ्लूची लस घेतल्यास आरोग्याला लाभदायी आहे.
डॉ. विजय हिरे, एमबीबीएस, एम.डी.

बातम्या आणखी आहेत...