आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडीचा कडाका वाढला:थंडीच्या कडाक्यात वाढ; तापमानही‎ 7 अंशावर; आठवडाभर राहणार थंडी‎

धुळे‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात थंडीचा कडाका वाढला आहे. गेल्या तीन ‎ ‎ दिवसापासुन रात्रीचे किमान तापमानाचा पारा ७ अंशावर ‎ ‎ स्थिरावला आहे. बुधवारी देखील किमान तापामान ७.६‎ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी ‎ ‎ सकाळपासून थंड वारे वाहत असल्याने दिवसभर गारठा ‎ ‎ होता. तर थंडीची ही स्थिती आठवडाभर टिकून‎ राहण्याचा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केला आहे.‎ जानेवारीच्या पहिल्या दिवसापासून रात्रीचे किमान‎ तापमानाचा पारा १० अंशाखाली आलेला आहे. तर‎ आता तीन दिवसांपासून सातत्याने किमान तापमानाचा‎ पारा ७ अंशावर स्थिरावलेला आहे.

कमाल तापमानही‎ ३० अंश सेल्सिअसखालीच नोंदवण्यात आले आहे.परंतु शहरात बुधवारी थंडीचे प्रमाण वाढलेले जाणवत‎ आहे. बुधवारी कृषी महाविद्यालयात किमान तापमान‎ ७.६ व कमाल तापमान २७ अंश सेल्सिअसची नोंद‎ करण्यात आली आहे. उत्तर व ईशान्यकडून वाहणाऱ्या‎ थंड वाऱ्यामुळे शहरात थंडी वाढली आहे. बुधवारी‎ सकाळपासूनच शहरात थंड वारे दिवसभर वाहत होते.‎

सोमवारी, मंगळवारी अधिक थंडी‎
शहरातील वातावरणात फरक झालेला आहे.‎ तापमानाचा पारा ७ अंशावर स्थिरावला आहे.‎ उत्तरेकडील बर्फाच्छादित पर्वतावरुन वाहणाऱ्या‎ वाऱ्यामुळे हा गारठा वाढला आहे. त्यातही सोमवारी व‎ मंगळवारी किमान तापमानात अजुन घट होईल.-‎ रामचंद्र साबळे, हवामान तज्ञ‎

बातम्या आणखी आहेत...