आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव:पर्यावरणपूरक मखर, सजावट साहित्य घेण्याकडे गणेशभक्तांचा वाढला कल ; बाजारात खरेदीसाठी गर्दी

धुळे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाडक्या गणरायाचे आगमन दाेन दिवसांवर आले असून, सजावटीचे साहित्य घेण्यासाठी बाजारात गर्दी होते आहे. विविध प्रकारच्या साहित्याने बाजारपेेठ सजली आहे. यंदा वेगवेगळ्या प्रकारचे मखर बाजारात विक्रीस आले आहे. फाेम शीटला कागदी, कापडी फुले लावलेले तसेच पुठ्ठ्यापासून तयार केलेले मखर बाजारात आले आहे. पर्यावरणपूरक साहित्य खरेदीला प्राधान्य दिले जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. बाजारात चारशे रुपयांपासून मखर विक्रीस आहे.

काेविडनंतर दाेन वर्षांनी गणेशोत्सव उत्साहात साजरा होणार आहे. शहरातील आग्राराेड, पाचकंदील, खाेलगल्ली, गल्ली क्रमांक पाच आदी भागात आराससाठी लागणारे साहित्य विक्रीस आले आहे. साहित्य खरेदीसाठी रविवारी गर्दी झाली हाेती. सजावटीसाठी लागणारी विविध आकार, प्रकारातील तोरण, माळा, फोमच्या कमानी, कागदी फूल, गोल मणी व मोत्यांची माळ, चंदनहार, कापडी आणि कागदी फुलांच्या माळा, लायटिंग आदी साहित्य बाजारात विक्रीस आले आहे. थर्माकोलला पर्याय म्हणून फोमशीटला मागणी वाढली आहे. पण फोमशीट महाग असल्याने कार्डशीट, गोल्डन पेपर, वेलवेट पेपर खरेदी केेले जाते आहे.

बातम्या आणखी आहेत...