आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय संविधान समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता या मूल्यांवर आधारित असून, ते केवळ कायद्याचे पुस्तक नाही तर राष्ट्राची एकात्मता अखंडता व संप्रभुता प्रवर्धित करण्याचे साधन आहे. त्यातील मूल्ये देशातील समस्यांचे निवारण करण्यासाठी आहेत. म्हणून त्याची सर्वांना ओळख होण्याची आणि त्यावर आचरण तसेच रक्षण आणि जपणूक करण्याचे आम्हा भारतीयांचे आद्य कर्तव्य व नैतिक दायित्व आहे, असे प्रतिपादन इंजिनिअर जैनुल आबेदीन शेख यांनी सर्वधर्म संघाच्या वर्धापन सोहळ्यात मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलताना केले.
आयस्काँनचे अध्वर्यू प्राचार्य व्ही. के. भदाणे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रपिता म.गांधीजींच्या स्मृतिदिनी सेंट अॅन्स कॅथॉलिक चर्चच्या प्रांगणात सर्वधर्म संघाच्या ३२ व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात मूव्हमेंट फॉर पीसचे राज्य कोषाध्यक्ष इंजि. शेख बोलत होते. याप्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अविनाश पाटील, डॉ. मृदुला वर्मा, हाजी करीम न्हावकर, पोपटराव चौधरी, विजयकुमार अग्रवाल, पी. सी. पाटील, रईस कतील, शाहीर माणिकराव शिंदे, मुमताज नादीर, डॉ. विजय चंद्र जाधव, नाजनीन शेख, सुरेश बैसाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
सुलोचना अग्रवाल, डॉ. शरद वाणी, मेजर राजू मशाल, ए. जी. शेख, प्रतिभा नेवे, अॅड. असिफ शेख, श्रीकृष्ण बेडसे, अब्दुल करीम पटेल आदी उपस्थित होते. शेख हुसेन गुरुजी यांनी प्रास्ताविक केले. रंजना नेवे यांनी सूत्रसंचालन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.