आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिनविरोध निवड:वकवाड विकासो सोसायटीच्या अध्यक्षपदी इंद्रसिंग पावरा

तऱ्हाडी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वकवाड आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी इंद्रसिंग माला पावरा (दुर्बड्या) तर उपाध्यक्षपदी सत्तरसिंग भोलजी पावरा (मोहिदा) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

वकवाड सोसायटी अंतर्गत शेमल्या, मोहीदा, दुर्बड्या, वकवाड या गावांचा समावेश आहे. या सोसायटीचे एकूण मतदान ३६० आहे. सोसायटीचे अध्यक्षपदाचा निवडीसाठी इंद्रसिंग माला पावरा व उपाध्यक्षपदासाठी सत्तरसिंग भोलजी पावरा यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने निर्णय अधिकारी म्हणून मनोहर भगवान माळी, मुख्य सचिव दर्शन रघुनाथ देशमुख, सहायक सचिव भीमराव गुमान पावरा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पॅनल प्रमुख मंगेश भाषा पावरा यांनी सहकार्य केले. माजी जिल्हा परिषद सदस्य (धुळे) दत्तू गुलाब पाडवी यांचे मार्गदर्शन लाभले. या प्रसंगी रेमा पावरा, दिलवरसिंग पावरा, बावाज्या पावरा, गुमान पावरा, निर्वाश्या पावरा, सुकमाबाई पावरा, राणूबाई पावरा आदी उपस्थित होते. या वेळी उपस्थितांनी नवनिवार्चित पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.

बातम्या आणखी आहेत...