आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभात फेरी:कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना महाडीबीटीबद्दल दिली माहिती

शहादा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहादा तालुक्यातील बुडीगव्हाण येथे कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना महाडीबीटीबद्दल माहिती देऊन प्रातिनिधिक १२ अर्ज ऑनलाइन करण्यात आले. नंतर इतर शेतकरी बंधूंना प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हा परिषद विद्यार्थ्यांकडून प्रभात फेरी काढण्यात आली. या वेळी कृषी विभाग योजनेचे घोषवाक्यही विद्यार्थ्यांनी दिले. यावेळी गावातील शेतकरी व कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

कृषी विभागाने आता महा-डीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य दिले. शेतकऱ्यांनी शेतीशी निगडित विविध बाबींकरिता अर्ज करावयाचा आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बंधूंनी आपला वैयक्तिक मोबाइल क्रमांक आपल्या आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. संकेतस्थळावरील ‘शेतकरी योजना’ हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वतःच्या मोबाइल, संगणक/ लॅपटॉप/ टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र आदी माध्यमातून संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतील, असे तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...