आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीईओचा उपक्रम:एकाच दिवशी 17 ग्रा.पं.च्या दप्तरांची तपासणी ;  दर शुक्रवारी 12 ग्रामपंचायतींच्या दप्तराची होणार तपासणी

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामपंचायतीचे दप्तर वर्षानुवर्षे तपासण्यात येत नाही, शासना कडून येणारा निधी, त्याचा झालेला विनियोगाचा हिशोब जुडत नाही, हा गोंधळ दूर करत प्रत्येक ग्रामपंचायतीचे दप्तर तपासणीची मोहिम मुख्यकार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी हाती घेतली आहे. प्रत्येक सोमवारी चिठ्ठी काढत शुक्रवारी १२ ग्रामपंचायतींना दप्तर तपासणीसाठी बोलावण्यात येणार आहे. त्या नुसार शुक्रवारी जिल्ह्यातील १७ ग्रामपंचायतीची दप्तर तपासणी करण्यात आली. यामुळे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागात सकाळी यात्रेचे स्वरुप होते. जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाल्या नंतर बुवनेश्वरी एस यांनी नाविण्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींच्या दप्तरांची पडताळणी अनेक वर्षापासून झालेली नाही. काही ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांच्या बदली नंतर देखील दप्तर हस्तांतरण करण्यात आलेले नाही.या शिवाय ग्रामपंचायत दप्तर बाबत अनेक तक्रारी देखील असतात. त्याचे निराकरण व्हावे, प्रत्येक ग्रामपंचायतीच्या दप्तराची योग्य बांधणी आणि व्यवस्थापन व्हावे या उद्देशाने मुख्यकार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस यांनी ग्रामपंचायत दप्तर तपासणीची मोहिम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील सर्व ५५० ग्रामपंचायतीच्या नावाच्या चिठ्या तयार करण्यात आल्या आहेत. सोमवार ते गुरुवारी या चार दिवसात ग्रामपंचायतीने दप्तर अद्यावत करुन शुक्रवारी दप्तरासह जिल्हा परिषदेत दाखल व्हावे,शुक्रवारी दिवसभरात मुख्यकार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस, उपमुख्यकार्यकारी अधिकारी ए.जे.तडवी हे दप्तराची तपासणी करणार आहेत. मागील आठवड्यात जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतीच्या चिठ्या काढण्यात आल्या. मात्र दप्तर तपासणी झाली नाही तर या आठवड्यात बारा ग्रामपंचायतींच्या चिठ्या काढण्यात आल्या.

पंचायत समितीसाठी बुधवार : मुख्यकार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस या प्रत्येक बुधवारी एका पंचायत समितीला भेट देणार आहेत. पहिल्या भेटीत पाहणी करुन आढावा घेणार आहेत. त्यानंतर पुढील भेटीत दप्तराची तपासणी करणार आहेत. पहिल्या भेटीत कामकाज सुधारण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यानंतर मात्र यथायोग्य कारवाई होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...