आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:‘तोत्तोचान’ पुस्तक वाचनाचा प्रेरणादायी उपक्रम ; शिक्षकांनी प्रभावी वाचन शैलीतून केलेले व्हिडिओ

कापडणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एका स्वच्छंदी बालिकेत आगळीवेगळी नावीन्यपूर्ण शाळा आणि तिथले कल्पक शिक्षक यामुळे झालेल्या वर्तनबदलांचे सुंदर अनुभव असलेल्या ‘तोत्तोचान’ या मूळ जपानी भाषेतील पुस्तकाचे चेतना सरदेशमुख देसाई यांनी केलेल्या अनुवादाचे धुळे जिल्ह्यातील शिक्षकांनी प्रभावी वाचन शैलीतून केलेले वाचन व्हिडिओ मालिकेच्या स्वरूपात क्रमश: वाचन उपक्रमाचे १ जून रोजी डायट धुळे येथे मान्यवर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी डायट धुळेच्या प्राचार्य डॉ. मंजूषा क्षीरसागर, प्राथमिक शिक्षणाधिकारी राकेश साळुंखे, ज्येष्ठ अधिव्याख्याता जे.एस.पाटील, सुचेता पाटील, डॉ.गिरीश बोरसे, सर्व अधिव्याख्याता, संपर्क अधिकारी डायट धुळे यांच्यासहित सर फाउंडेशन धुळे टीमचे समन्वयक अविनाश पाटील, गोकुळ पाटील, हेमलता पाटील, राकेश जाधव, संगीता शिंदे, ललिता देसले, सुधर्मा सोनवणे, जितेंद्र भदाणे, चित्रा पवार, सुनीता गायकवाड उपस्थित होते. हा उपक्रम धुळे जिल्ह्यासह राज्यातील शिक्षक-विद्यार्थी आणि पालक यांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल असे डाएटचे प्राचार्य डॉ. मंजूषा क्षीरसागर यांनी सांगितले. तर शिक्षणक्षेत्रात कार्यरत सर्वांनी आवर्जून पुस्तकातील प्रत्येक भाग ऐकावे आणि आपल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध व्हावे, असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी राकेश साळुंखे यांनी केले. या उपक्रमामुळे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र निर्मितीत धुळे जिल्ह्याच्या आलेख नक्कीच उंचावेल असे सर फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक तथा उपक्रम संयोजक सुनील मोरे यांनी अधिक माहिती देताना स्पष्ट केले.

५५ वाचकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धुळे,जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग धुळे आणि सर फाऊंडेशन धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या उपक्रमात धुळे जिल्ह्यातील ५५ वाचकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन यातील ५५ भागांचे वाचन केले. या वाचन व्हिडिओ भागांचे १ जून ते २६ जुलै पर्यंत अखंडितपणे दररोज सकाळी ९ वाजता सर फाऊंडेशनच्या राज्यस्तरीय यूट्यूब चॅनेलवरून प्रसारण केले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...