आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक:दहा दिवसांत हाती मिळणार प्राथमिक शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीचे आदेश; इच्छुक शिक्षक येणार स्वगृही

धुळे15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदलीसाठी मागील दोन वर्षापासून प्रतीक्षा होती. या प्रक्रियेला दोन वर्षांनंतर गती मिळाली आहे. आंतर जिल्हा बदली बाबत ग्रामविकास विभागाने काही बदल केले आहेत. सुरुवातीलाच शिक्षकांची माहिती अपटेड करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. दरम्यान, व्हेरिफिकेशनची कार्यवाही पूर्ण झाली आहे. आता १३ ऑगस्ट रोजी प्राथमिक शिक्षकांच्या हाती आंतरजिल्हा बदलीचे आदेश पडणार आहेत. अवघ्या दहा दिवसांत ही प्रक्रिया पार पडणार आहे.

जिल्ह्यात ज्या शिक्षकांना दहा वर्षे सेवा पूर्ण झाली आहेत. त्यासोबतच शाळेवर पाच वर्षे सेवा पूर्ण झाली आहे. असे शिक्षक आंतर जिल्हा बदलीसाठी पात्र ठरणार आहेत. याबाबत ग्रामविकास विभागाला सर्व शिक्षकांची माहिती शिक्षण विभागाकडून पाठवण्यात आली आहे. ही माहिती सॉफ्टवेअरमध्ये अपडेट करण्यात आली आहे. जी माहिती दिली याची शिक्षकांना पडताळणी करण्याची संधी देत आक्षेपही दूर केले आहेत.

ऑनलाइन जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया २०२१-२२ ग्रामविकास विभाग मार्फत देण्यात आलेल्या एक्सेल शीटमधील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या माहितीचे अपडेटेशन तथा रिक्त माहितीची नोंदणी अद्ययावत करण्याबाबत जि.प च्या सीईओंनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या २०२२ मधील बदल्या या संगणक प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. तांत्रिक कारणासह अन्य कारणास्तव ही दोन माध्यमे असून यामध्ये मुख्याध्यापक, प्राथमिक पदवीधर इयत्ता ६ वी ते ८ वी, सहशिक्षक इयत्ता १ लकी ते ५ वी असे आहेत. बदली ८ एप्रिल २०२१ निर्णयानुसार होणार असून ग्राम विभागाने नव्याने तयार केलेल्या स्वॉफ्टवेअरनुसार या प्रणाली कार्यरत होण्यासाठी काही विलंब झाला आहे. मात्र, आता ऑनलाइनद्वारे बदल्या करण्यासाठीची कार्यवाही पूर्ण झाली असल्याने राज्यातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची कार्यवाही तातडीने २ ऑगस्टपासून हाती घेण्यात आली आहे.

असे आहे आंतरजिल्हा बदलीचे वेळापत्रक
शिक्षकांची बिंदुनामावली अपलोड करणे २ ते ८ ऑगस्ट, शिक्षकांची बिंदुनामावली प्रसिद्ध करणे ४ ते ५ ऑगस्ट, बिंदुनामावली अवलोकनाकरिता प्रदर्शित करणे ५आगस्ट, आंतरजिल्हा बदलीकरिता अर्ज प्रक्रिया ६ ते ९ ऑगस्ट, आंतरजिल्हा बदलीची कार्यवाही सुरू१०ते १२ ऑगस्ट आंतरजिल्हा बदलीचे आदेश निर्गमित करणे १३ ऑगस्ट या वेळापत्रकानुसार बदली होणार आहे.

सॉफ्टवेअरच्या माध्यमातून एकत्र केली माहिती
शिक्षकांची माहिती भरण्यापासून ते एकूण माहिती एकत्र करणे ही प्रक्रिया सॉफ्टवेअरच्या माध्यमातून १० ते १२ ऑगस्ट राबवण्यात आली आहे. यासाठी पडताळणी तसेच माहितीबाबतच्या हरकती मागवून पूर्णत: सत्यबाबी ऑनलाइन केल्या आहेत. यानंतर पुढील दहा दिवसांत ॲक्शन मोडवर प्रक्रिया होणार आहे.
मोहन देसले, शिक्षणाधिकारी, प्राथमिक

बातम्या आणखी आहेत...