आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाठपुरावा:आंतरजातीय विवाह; 2 वर्षांनी अनुदान

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामाजिक न्याय विभागातर्फे आंतर जातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहन अनुदान देण्यात येते. दोन वर्षांपासून हे अनुदान रखडले होते. अनुदान मिळावे यासाठी सातत्याने पाठपुरावा झाला. त्यानंतर गुरुवारी तीन पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा धनादेश दिला.जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून ५० हजार रुपये दिले जातात.

दोन वर्षांपासून अनुदानाची रक्कम रखडली होती. जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी मनीष पवार यांनी पाठपुरावा केल्यावर शासनाने अनुदान मंजूर केले. त्यानंतर पहिल्या टप्प्यात तीन जणांना मान्यवरांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात देण्यात आले. या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे, उपाध्यक्षा कुसुम निकम, मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, प्रकल्प अधिकारी प्रतिभा संगमनेरे, सभापती संग्राम पाटील, सभापती धरती देवरे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...