आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष सहकार्य:लोणखेडा वरिष्ठ महाविद्यालयात‎ आंतरराष्ट्रीय सूक्ष्मजीव दिन कार्यक्रम‎

शहादा‎8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोणखेडा येथील पूज्य साने गुरुजी ‎विद्या प्रसारक मंडळाच्या कला ‎विज्ञान व वाणिज्य वरिष्ठ ‎महाविद्यालयात मायक्रोबायोलॉजी ‎ ‎सोसायटी ऑफ इंडियाच्या स्टुडंट युनिट म्हणजे सूक्ष्मजीवशास्त्र ‎विभागात आंतरराष्ट्रीय सूक्ष्मजीव दिन उत्साहात साजरा करण्यात‎ आला.‎ यानिमित्ताने ’प्रोबायोटिक फूड''‎ प्रदर्शन व स्पर्धा आयोजित‎ करण्यात आली होती. या स्पर्धेचे‎ उद्घाटन महाविद्यालयाचे‎ उपप्राचार्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष‎ प्रा. डॉ. एम. के. पटेल यांनी केले.‎ १७ सप्टेंबर १६८३ रोजी एन्टनी वून‎ ल्यूवेनहाँक यांनी एक पेशीय‎ सूक्ष्मजीव वर लिहिलेला शोध‎ निबंध ‘ रॉयल सोसायटी ऑफ‎ लंडन'' ला सादर केला होता.

त्याच्या सन्मानार्थ हा दिवस‎ ‘आंतरराष्ट्रीय सूक्ष्मजीव दिन''‎ म्हणून साजरा केला जातो. या‎ प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एम.‎ के. पटेल यांनी ‘प्रोबायोटिक फूड''‎ व त्याचे आरोग्यासाठी असलेले‎ महत्त्व विद्यार्थ्यांना समजवून‎ सांगितले. या कार्यक्रमासाठी‎ परीक्षक म्हणून ‘ कॉलेज ऑफ‎ फार्मसी'' च्या प्राध्यापिका प्राची‎ दुसाने यांनी सहकार्य केले.‎ कार्यक्रमाचे नियोजन व‎ सूत्रसंचालन विभाग प्रमुख डॉ. ए.‎ एच. जोबनपुत्रा यांनी केले.‎ कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.डॉ‎ आर. झेड. सय्यद, प्रा. रमाकांत‎ माळी यांनी विशेष सहकार्य केले.‎