आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:विद्यार्थिनी वैशालीच्या आत्महत्येची चौकशी करा, अन्यथा आंदोलन छेडू; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

धुळे3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोंडाईचा येथील आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृहातील आदिवासी तरुणी वैशाली तापीदास गावित हिने आत्महत्या केली. तिने आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली, याबाबतची चौकशी करण्यात यावी, या घटनेचा तपास सीबीआयतर्फे करण्यात यावा, अशी मागणी भिलिस्तान लायन सेनेतर्फे करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

दोंडाईचा येथे आदिवासी विकास विभागाच्या आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात सिव्हिल इंजिनिअरिंगचा पहिल्या वर्षाचे शिक्षण घेणारी वैशाली तापीदास गावित हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. ती अहिंसा कॉलेजला शिक्षक होती. गणिताचा पेपर देऊन दोन वाजेच्या सुमारात ती वसतिगृहात आली. त्यावेळी तिने आत्महत्या केली. वसतिगृहातील ही आत्महत्येची दुसरी घटना आहे. या वसतिगृहात आत्महत्या का होतात, याचे कारण शोधले पाहिजे. या घटनेचा भिलिस्तान लायन सेना दलित, आदिवासी, ओबीसी मुस्लिम अन्य मागासवर्गीय हक्क व न्यायासाठी लढणाऱ्या संघटनांतर्फे जाहीर निषेधही निवेदनातही करण्यात अला आहे. ही घटना आत्महत्या आहे की हत्या याबाबतची सखोल चौकशी सीबीआयमार्फत करण्यात यावी व हत्येमागील सत्य उलगडण्यात यावे, अशी मागणी निवेदनात भिलिस्तान लायन सेनेचे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा सुकमाबाई सोनवणे यांच्यासह इतरांकडून करण्यात आली आहे. याप्रकरणी आदिवासी वसतिगृह व अहिंसा कॉलेजची चौकशी करण्यात यावी, अन्यथा याबाबत आदिवासी मुलींच्या हक्कासाठी आंदोलनाचा इशारा दिला.

बातम्या आणखी आहेत...