आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:लाचखोरी प्रकरणातील १३ अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी सुरू ; वीज कंपनीचे अधिकारी, कर्मचारी जास्त

गणेश सूर्यवंशी | धुळे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काम करायचे असेल तर पैसे लागतील असे सांगून लाच मागणाऱ्या २७ विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गेल्या पाच वर्षांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. १३ अधिकाऱ्यांच्या संपत्तीची तर २० जणांच्या अपसंपदेची चौकशी सुरू आहे. त्यातील काही निवृत्त झाले आहे. महसूल व जिल्हा परिषदेचे विभाग लाचखोरीत अग्रभागी आहे. २०१७ पासून लाचखोरी प्रकरणी १५४ गुन्हे दाखल झाले. महसूल विभागातील ३२ तर जिल्हा परिषदेतील ३१ लाचखोरांवर कारवाई झाली. विविध १७ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांचा तपास सुरू आहे.

या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी
संपत्तीची चौकशी होणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये वीज कंपनीचे अधिकारी जास्त आहे. त्यात प्रथम श्रेणीतील मनपाचा एक, वीज कंपनीचे दोन, द्वितीय श्रेणीत वीज कंपनी व आरटीओ विभागातील प्रत्येकी दोन तर वनविभाग, पाटबंधारे, गटविकास अधिकारी व सेवाकर विभागातील प्रत्येकी एक अधिकारी आहे.

संपत्ती आली कुठून ? एवढी संपत्ती कशी आली याचा शोध घेण्यासाठी अपसंपदेच्या तक्रारी असलेल्या २० जणांकडे उघड व गुप्त अशा दोन्हीस्तरांवर चौकशी सुरू आहे. आरोप असलेले कर्मचारी, निवृत्त कर्मचारी, त्यांच्या पत्नीकडे विचारपूस झाली आहे. याशिवाय सबंधितांच्या नियुक्तीपासून ते आजवरच्या मिळकतीचा हिशेब होतो आहे.

कारवाई झालेले २७ विभाग
कारवाई झालेल्या विभागांमध्ये महसूल, जि. प, मनपा, दुय्यम निबंधक, पाटबंधारे, न्यायालय, सार्वजनिक न्याय कार्यालय, वीज कंपनी, राज्य माहिती आयोग, वन, कामगार खाते, पोलिस, नगर भूमापन, एमआयडीसी, आरोग्य, आरटीओ, पशुसंवर्धन, कोषागार, राज्यउत्पादन, समाज कल्याण विभाग, नगर भूमापन, शिक्षण आदी विभाग आहे.

१२ पोलिसांवर कारवाई : कारवाई झालेल्यात् १२ पोलिस आहे. त्यापैकी सन २०१७ व १८ मध्ये प्रत्येकी एक, सन २०१९ व २०२० मध्ये प्रत्येकी २ तर २०२१ व २०२२ मध्ये प्रत्येकी ३ जणांवर कारवाई झाली.

यांच्या पथकाने केली कारवाई
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाची धुरा उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्याकडे आहे. तसेच अधिकारी प्रकाश झोडगे, मंजितसिंग चव्हाण, कर्मचारी राजन कदम,शरद काटके, कैलास जोहरे, भुषण खलाणेकर, संदीप कदम, भुषण शेटे, संतोष पावरा, प्रशांत बागुल, प्रविण पाटील, गायत्री पाटील, रोहीनी पवार, वनश्री बाेरसे, सुधीर मोरे कार्यरत आहे.

१५४ तक्रारी, पण तिघांनीच नाकारली लाच : केवळ ३ जणांनीच लाच घेण्यास नकार दिला. एवढेच नव्हे तर लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला रंगेहात ताब्यात घेण्यास मदत केली असल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...