आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील श्री क्षत्रिय महाराणा प्रतापसिंह यांच्या स्मारकाच्या ठिकाणी धूलिवंदनाच्या दिवशी सप्तशृंगी माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र भटुलाल अग्रवाल यांच्या सहकार्याने नागरिकांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले. या उपक्रमाचा शुभारंभ राजेंद्र अग्रवाल यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व नागरिकांना पाणी वाटप करून झाला. यावेळी तालुका राजपूत समाज मंडळाचे अध्यक्ष संजय राजपूत, किशोरसिंग गिरासे, कोमलसिंग गिरासे, अजबसिंग गिरासे, डॉ.प्रेमसिंग गिरासे, गणपतसिंग गिरासे, कोमलसिंग गिरासे, पुसनद, उपमुख्याध्यापक जिजाबराव पाटील, रा.स्व.संघाचे संजय कासोदेकर, ग्राहक संघटनेचे अध्यक्ष उदय निकूम, हर्षल सोनवणे, विजय पाटील, राजू माळी, भिका महाजन, विजय परदेशी, अॅड.गोविंद पाटील उपस्थित होते. वाढते तापमान लक्षात घेता सामाजिक उपक्रम म्हणून तालुका राजपूत समाज मंडळातर्फे अग्रवाल यांच्या सौजन्याने उन्हाळा संपेपर्यंत नागरिकांना शुद्ध पाणी नागरिकांना पिण्यासाठी मिळणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.