आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:नाल्यांवरील अतिक्रमणाकडे‎ पाटबंधारे विभागाचा कानाडोळा‎

धुळे‎6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळ्यात नाल्यांना पूर आल्याने अनेकांच्या‎ घरात पाणी शिरले हाेते. सर्व नाले पाटबंधारे‎ विभागाच्या अखत्यारित येत असल्याने या‎ विभागाला नाल्यावरील अतिक्रमण‎ काढण्यासाठी पत्र दिले होते. पण पाटबंधारे‎ विभागाने कारवाई केली नाही. त्यामुळे‎ भविष्यात गंभीर स्थिती निर्माण झाल्यास‎ त्याला पाटबंधारे विभाग जबाबदार असेल,‎ असा इशारा महापालिका समिती सभापती‎ शीतल नवले यांनी पाटबंधारे विभागाला‎ पाठवलेल्या पत्रात दिला आहे.‎

पावसाळ्यात शहरातील माेतीनाला,‎ देवपुरातील सुशीनाला, दैठणकर नगर, भरत‎ नगर, केशर नगर, एसआरपीएस काॅलनी,‎ याेगेश्वर काॅलनी, चिताेड राेड परिसरातील‎ नाल्या काठावरील नागरिकांच्या घरात‎ नाल्याच्या पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे‎ गंभीर स्थिती निर्माण झाली हाेती. शहरातून‎ वाहणारे नाले पाटबंधारे विभागाच्या मालकीचे‎ आहे.

नाल्यावर दीड हजारांपेक्षा जास्त‎ नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे हे‎ अतिक्रमण काढण्याबाबत पाटबंधारे विभागाने‎ कारवाई करावी, असे पत्र महापालिकेने‎ पाटबंधारे विभागाला दिले हाेते. पण पाटबंधारे‎ विभागाने कारवाई केली नाही. याविषयी‎ सभापती नवले यांनी पुन्हा पाटबंधारे‎ विभागाला पत्र पाठवले आहे. नाल्यांवरील‎ अतिक्रमण काढण्याची जबाबदारी पाटबंधारे‎ विभागाची आहे. त्यामुळे अतिक्रमण काढावे,‎ अशी सूचना सभापती शीतल नवले यांनी‎ दिल्या.

बातम्या आणखी आहेत...