आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:चार रेशन दुकानांना आयएसओ मानांकन; धुळे शहर व तालुक्यातील प्रत्येकी दोन दुकानांचा समावेश

धुळे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे शहरातील दाेन आणि तालुक्यातील दाेन अशा चार रेशन दुकानांना आयएसआे मानांकन प्राप्त झाले आहे. तसेच शिंदखेडा, शिरपूर व साक्री तालुक्यातील काही दुकानांनाही आयएसआे मानांकन प्राप्त झाले. त्यामुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांच्यासह पुरवठा निरीक्षक, दुकानदार व पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांचा गाैरव झाला.

पुरवठा विभागाचे सर्व कार्यालय, शासकीय धान्य गाेदाम, स्वस्त धान्य दुकाने आयएसआे करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, सहायक पुरवठा अधिकारी मुकेश कांबळे, पुरवठा निरीक्षक मायानंद भामरे, छाेटू चाैधरी आदींच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहरातील दाेन व तालुक्यातील दाेन अशा एकूण चार रेशन दुकानांना आयएसआे मानांकन प्राप्त झाले. दुकानदारांनी स्वच्छता, ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या मूलभूत सेवा, अभिलेख करणे, दुकानात विविध प्रकारची माहिती देणारे फलक लावणे, सर्व प्रकारचे परवाने देणे आदींची पूर्तता केल्याने मानांकन देण्यात आले.

त्यानुसार धुळे शहरातील दुकान क्रमांक १३ व ४८ तर धुळे तालुक्यातील निमडाळे येथील दुकान क्रमांक ५८ व काळखेडे येथील दुकान क्रमांक २७ ला मानांकन प्राप्त झाले. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, तालुका पुरवठा निरीक्षक मायानंद भामरे, पुरवठा निरीक्षक छाेटू चाैधरी, हर्षा महाजन आदींसह दुकानदारांचा सत्कार झाला. यापूर्वी शिंदखेडा तालुक्यातील पाटण आणि दाेंडाईचा येथील बचत गटाच्या रेशन दुकानाला आयएसआे मानांकन देण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...