आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातारुण्य हे स्वप्नांच्या शिलेदारांचा एक धुंद आविष्कार असतो. तारुण्यात प्रत्येकाने सजग राहाणे आवश्यक आहे. तसेच मैत्री, प्रेम व आकर्षण यातील फरक ओळखता आला पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. वैशाली पाटील यांनी केले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत आदिवासी मुलींच्या वसतिगृहात त्यांची प्रतिभेचे बीज उमलताना या अभियानांतर्गत दिल तो बच्चा है जी याविषयावर मानसशास्त्रीय कार्यशाळा झाली.त्या वेळी त्या बोलत होत्या.
आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्पाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला. या वेळी वसतिगृहाच्या गृहपाल अलका दाभाडे, मंजुश्री जाधव आदी उपस्थित होत्या. प्रा. वैशाली पाटील म्हणाल्या की, मैत्रीत दोन विचार व दोन संस्कार एकत्र येत जीवनाला आकार देतात. जशी संगत असे तशीच गती आणि तशीच मती होते. मैत्रीत निकोपपणा व खुलेपणा असला तर संशयाला जागा राहत नाही. प्रेम म्हणजे एकमेकांना सुखी पाहण्याची पराकोटीची शुद्ध भावना असते. एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात हवीच या अट्टाहासाने आपण अनेक दुःखांना आमंत्रण देतो.
जे प्रेम बाह्य सौंदर्यावर भाळून होते त्यात मनाची कवाडे उघडण्याचे सामर्थ्य नसते ते फक्त आकर्षण असत. हे आकर्षण तितक्याच वेगाने संपत. मानसशास्त्रानुसार खरं प्रेम हे वयाच्या २५ किंवा २६ व्या वर्षी होऊ शकत. प्रेम हे नेहमी एखाद्याच्या सहवासात चार ते पाच वर्षे राहण्याने, बौद्धिक किंवा शाब्दिक चर्चेतून, विचारातून, एकमेकांच्या आवडी निवडीतून, सहजतेतून निर्माण होते. जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते.
ती तुमच्या आई-वडिलांचा, तुमच्या करिअरचा, बदनामीचा विचार करते. तुमच्या इच्छेपलीकडे ती कधीच तुम्हाला स्पर्श करत नाही. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करत नाही. प्रत्येक गोष्टीची वेळ असते. त्या वयात त्या गोष्टी झाल्या तरच आयुष्य सार्थकी लागते असेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यशाळेत २६९ मुलींनी सहभाग नोंदवला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.