आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रभाषा सभेतर्फे पुस्तकांचे प्रकाशन:देश अन् राष्ट्रामधील फरक महात्मा गांधी यांच्यामुळेेच जगाला कळाला; न्यायमूर्ती धर्माधिकारी यांचे मत

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महात्मा गांधी यांचे कार्य महान होते. त्यांनी कधीही स्वत:ला राष्ट्रपिता म्हणून मिरवले नाही. देश आणि राष्ट्रातील फरक महात्मा गांधी यांच्यामुळे जगाला समजला. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने राष्ट्रपिता ठरतात, असे प्रतिपादन उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी केले.महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेतर्फे रविवारी हिंदी पंधरवड्याचा समारोप, पुस्तक प्रकाशन, गुणगौरव सोहळा आणि विचार मंचचे लोकार्पण झाले.

त्या वेळी ते बोलत होते. राष्ट्रभाषा सभेचे अध्यक्ष उल्हास पवार, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, नई तालिमचे अध्यक्ष डॉ. सुगंथ बरंठ, सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष रमेश दाणे, राष्ट्रभाषा सभेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. पीतांबर सरोदे, प्राचार्य विश्वास पाटील, अॅड. शुभांगी पाटील उपस्थित होते.

िनवृत्त न्यायमूर्ती धर्माधिकारी म्हणाले की, हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी गांधीजींच्या मार्गाने प्रयत्न करावे लागतील. महात्मा गांधी यांचा जन्म दिवस अहिंसा दिवस म्हणून साजरा होतो. महात्मा गांधी या शब्दाचा अर्थ शांती, अहिंसा, सत्य यासाठी वापरला जातो. त्यामुळे हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळून देण्यासाठी महात्मा गांधी यांच्या मार्गाने प्रयत्न करावे लागतील, असेही ते म्हणाले. माजी आमदार उल्हास पवार यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा.जसपालसिंग सिसोदिया यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. चंद्रमा पाटील, निशा काकडे यांनी सूत्रसंचालन केले.

बातम्या आणखी आहेत...