आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे:खापर येथे कानुबाईतेचा केला जागर

खापर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खापर येथे कानबाई माता उत्सव मोठ्या उत्साहात साजरा. खान्देश कुलदैवत असलेल्या कानबाई मातेची रविवारी जल्लोषात स्थापना करून सोमवारी विसर्जन करण्यात आले. रात्री विविध गीतांचे गायन, भजन, नृत्य सादर करून रात्रभर अखंड जागर करून साजरा करण्यात आला. तर सोमवारी ढोल-ताशांच्या गजरात नाचत भाविकांनी विसर्जन मिरवणूक काढून खापर येथील देहली नदीवर विसर्जन केले.

पंधरा दिवस आधीपासूनच उत्सवाच्या तयारीची सुरुवात होते. कानबाई मातेची स्थापना करण्यात आली. फुलामाळांनी सजवून देवीचा गाभारा आणि मंडप तयार केला होता. कलशावर नारळ ठेवून त्यावर नथ, डोळे लावून त्याला कानबाई मातेचं रुप दिले. रात्री कानबाई मातेची स्थापना करून रात्रभर कुटुंबातील सदस्य अहिराणी भाषेतील लोकगीतांवर नृत्य सादर केले.

बातम्या आणखी आहेत...