आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निदर्शने:सरकारच्या निर्णयाविरोधात जैन समाजाचा काळ्या फिती बांधून शहरात मूकमोर्चा

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

झारखंड सरकारने जैन धर्मीयांचे पवित्र तीर्थक्षेत्र श्री सम्मेद शिखराला पर्यटन स्थळाचा दर्जा दिल्याने याठिकाणी पर्यटकांची संख्या वाढेल. त्यातून या तीर्थक्षेत्राचे पावित्र्य नष्ट हाेईल. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात शहरातील सकल जैन समाजातर्फे हाताला काळ्या फिती बांधून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमाेर्चा काढण्यात आला. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात येऊन प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

हा मोर्चा आग्राराेड, महापालिकेची जुनी इमारत मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. मोर्चात सहभागी झालेल्यांनी हाताला काळ्या फिती बांधून झारखंड सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. जैन धर्मातील २४ तीर्थंकरांपैकी २० तीर्थंकर ज्या भूमीत माेक्षाला गेले त्या तीर्थक्षेत्र श्री सम्मेद शिखरला झारखंड सरकारने पर्यटन स्थळ म्हणून घाेषित केले आहे. त्यामुळे आगामी काळात या ठिकाणी मांसाहार, मद्याची विक्री होईल. इतर व्यवसाय सुरू होतील. या सर्व बाबी अहिंसा तत्त्वाच्या विराेधात आहे. त्यामुळे झारखंड सरकारने हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी मोर्चाद्वारे करण्यात आली.

प्रतिष्ठाने ठेवली बंद... माेर्चात सहभागी सर्व पुरुषांनी पांढरा पायजमा, झब्बा तर महिलांनी लाल रंगाची बांधणीची साडी परिधान केली हाेती. प्रत्येकाने हाताला काळी फीत बांधली हाेती. माेर्चा संपेपर्यंत शहरातील जैन समाजबांधवांनी दुकान बंद ठेवली होती.

बातम्या आणखी आहेत...