आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:तीन वर्षांच्या भाजलेल्या शिवमच्या उपचारासाठी धुळ्यातील जैन ट्रस्टतर्फे अडीच लाखांची मदत; आमटीचे गरम पातेले सांडल्याने शिवम भाजला 50 टक्के

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे जिल्ह्यातील खेमसेवाडी येथील शिवम दत्तात्रय खेमसे हा तीन वर्षीय बालक पेटत्या चुलीवरील आमटीचे गरम पातेले अंगावर सांडल्याने भाजला होता. ५० टक्के त्याचे शरीर भाजले गेले हाेते. त्याला उपचारासाठी शहरातील जैन ट्रस्टतर्फे अडीच लाखाचे लक्षवेधी अर्थसहाय्य करण्यात आले.

खेमसेवाडी (जि.पुणे) येथील दत्तात्रय खेमसे यांचा तीन वर्षाचा शिवम कुटुंबियांची नजर चुकवून स्वयंपाक घरात गेला. त्याचा धक्का लागून आमटीचे पातेले त्यांच्या अंगावर सांडले. त्यात ५० टक्के शरीर भाजले गेले. त्यांच्यावर उपचारासाठी खेमसे यांची परिस्थिती नव्हती. त्यांनी समवेदना कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर शिवमला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये शिवमला दाखल करण्यात आले होते. समवेदना संस्थेचे कार्यकारी अधिकारी अमर पवार यांनी २० मे रोजी जैन ट्रस्टला शिवमच्या सह्याद्री हॉस्पिटलमधील उपचाच्या अर्थसहाय्यासाठीचा प्रस्ताव सादर केला. त्यानुसार खेमसे परिवारातर्फे अमर पवार यांनी अत्यावश्यक ती कागदपत्रे स्व. रतिबाई मगनलाल जैन पब्लिक ट्रस्टला उपलब्ध करून दिल्यानंतर अडीच लाख रूपये पाठविण्याची विनंती केली होती. त्यानुसार जैन ट्रस्टचे विश्वस्तांशी संपर्क करीत प्रा.डॉ.न.म.जैन यांनी तातडीने अडीच लाखाचा निधी वर्ग केला.

जैन ट्रस्टच्या देणगीदारांचे खरे श्रेय
खेमसे परिवारातर्फे अमर पवार यांनी अत्यावश्यक ती कागदपत्रे धुळे येथील स्व. रतिबाई मगनलाल जैन पब्लिक ट्रस्टला उपलब्ध करून दिल्यानंतर निधी देण्यात आला. अशा संदर्भात ट्रस्ट केवळ निमित्तमात्र ठरतो. श्रेय खऱ्या अर्थाने जैन ट्रस्टच्या देणगीदारांकडे जाते, अशी भावना ट्रस्टचे प्रभारी कार्यकारी विश्वस्त प्रा.डॉ.संजीव जैन यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...